Yuzvendra Chahal’s Hat-Trick : भारतीय संघातील स्टार लेग स्पिनर युजवेंद्र चहलने आयपीएल २०२२ ची पहिली हॅटट्रीक आपल्या नावावर केली आहे. राजस्थान रॉयल्सच्या या स्पिनरने सोमवारी रात्री मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियममध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या विरुद्ध आपली हॅटट्रीक पूर्ण केली. चहलची आयपीएल मधली ही पहिली आणि या सीजनमध्ये कोणत्याही गोलंदाजाने केलेली पहिली हॅटट्रीक आहे. चहलने १७व्या ओव्हरमध्ये हॅट्रीकसह ४ विकेट्स घेतले. त्याने या ओव्हरमध्ये कोलकाताचा कप्तान श्रेयस अय्यर, शिवम मावी आणि पॅट कमिन्स यांना बाद केले.
चहल खास नियोजन करून या सामन्यामध्ये उतरला होता आणि सामन्यानंतर त्याने याचा खुलासा केला. या स्टार लेगस्पिनरने सांगितले की, चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याची त्याची योजना होती आणि त्यासाठी त्याने सामन्याच्या एक दिवस आधी प्रशिक्षक आणि कर्णधारासोबत खास योजना आखली होती.
यादरम्यान, ५ विकेट्स घेतल्यानंतर चहलने दिलेली पोज सोशल मीडियावर भलतीच व्हायरल झाली आहे. ५ विकेट्ससाठी सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर त्याने आपल्या या सेलिब्रेशनचे स्पष्टीकरण दिले. यावेळी तो म्हणाला की २०१९च्या विश्वचषकाच्या वेळी तो गॉगल लावून सीमारेषेजवळ बसलेला असतानाच फोटो तुफान व्हायरल झाला होता. तेच व्हायरल मिम पुन्हा तयार करण्याचा त्याने प्रयत्न केला होता.
एलियनमुळे महिला गरोदर! अमेरिकच्या संरक्षण मंत्रालयाच्या अहवालात धक्कादायक खुलासा
चहलची पोज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केलेले मिम बनली होती आणि लेग-स्पिनरने सोमवारी त्याच्या सेलिब्रेशनसह त्याची कबुली दिली. खरेतर, त्याने एकदा वचन दिले होते की जेव्हाही तो ५ विकेट घेईल तेव्हा तो ही पोझ पुन्हा करेल.
आयपीएलमध्ये हॅटट्रीक घेणारा चहल या मोसमातील पहिला आणि आतापर्यंतचा २१वा तसेच, राजस्थान रॉयल्सचा पाचवा गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी अजित चंडिला, प्रवीण तांबे, शेन वॉटसन आणि श्रेयस गोपाल यांनी आयपीएलमध्ये राजस्थान संघासाठी हॅटट्रीक घेतली आहे. चहल व्यतिरिक्त लक्ष्मीपती बालाजी, अमित मिश्रा, युवराज सिंग, रोहित शर्मा, प्रवीण कुमार, अझील चंडेला, प्रवीण तांबे, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट, श्रेयस गोपाल आणि हर्षल पटेल हे असे भारतीय गोलंदाज आहेत ज्यांनी आयपीएलमध्ये हॅटट्रीक घेतली आहे. मिश्राने सर्वाधिक तीन वेळा हा पराक्रम केला आहे.