KKR beat RCB by 21 runs: आयपीएल २०२३ मधील ३६ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला घरच्या मैदानावर दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम खेळताना २० षटकांत ५ गडी गमावून २०० धावा केल्या. ज्याचा पाठलाग करताना आरसीबी संघ २० षटकात केवळ १७९ धावा करू शकला. त्यामुळे त्यांनी हा सामना २१ धावांनी गमावला. या सामन्यात आरसीबीचे फलंदाज अपयशी ठरले. केवळ विराट कोहलीलाच अर्धशतक करता आले. या पराभवानंतर विराट कोहलीने पराभवाचे कारण सांगताना एक मोठे वक्तव्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आम्ही हरण्यास पात्र होतो –

सामन्यानंतर बोलताना विराट कोहली म्हणाला, “खरे सांगायचे तर आम्ही सामना त्याच्यांकडे सोपवला होता. आम्ही मैदानावर व्यावसायिकता दाखवली नाही म्हणून आम्ही हरण्यास पात्र होतो. साहजिकच आम्ही दर्जेदार खेळ करत नव्हतो आणि हे मान्य करण्यात अजिबात संकोच नसावा. जर तुम्ही सामन्यावर नजर टाकली, तर आम्ही आमच्या संधीचा फायदा घेतला नाही. आम्ही काही संधी गमावल्या, ज्यामुळे आम्हाला २५-३० अधिक धावा द्याव्या लागल्या. क्षेत्ररक्षणातही आम्ही काही संधी गमावल्या, ज्याची किंमत आम्हाला सामना गमावून चुकवावी लागली.”

आम्ही खेळात टिकून राहण्यापासून एक भागीदारी दूर होतो –

पराभवाचे कारण सांगताना कोहली पुढे म्हणाला, “आम्ही अशा चेंडूंवर विकेट गमावल्या, ज्यावर क्षेत्ररक्षकांनी सहज बाद केले. लक्ष्याचा पाठलाग करताना विकेट गमावल्यानंतरही आम्ही खेळात टिकून राहण्यापासून एक भागीदारी दूर होतो.” कोहली पुढे म्हणाला की, “मला वाटते की, आम्ही एक सामना जिंकतो आणि दुसरा हरतो. याची आम्हाला काळजी वाटली पाहिजे. स्पर्धेच्या नंतरच्या टप्प्यात चांगल्या स्थितीत राहण्यासाठी आम्हाला काही सामने जिंकण्याची गरज आहे.”

हेही वाचा – WTC Final: योग्य सलामीवीर निवडण्याबाबत मायकल वॉनचा टीम इंडियाला सल्ला! म्हणाला, “इतिहासाची पुनरावृत्ती होईल असे गृहित…”

या सामन्यात विराट कोहली व्यतिरिक्त इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. कोहलीने ३७ चेंडूत ५४ धावा केल्या. तर फॅफने १७, शाहबाज २, मॅक्सवेल ५, लोमरोर ३४ आणि दिनेश कार्तिक केवळ २२ धावा करू शकले. आरसीबीचा एकही फलंदाज संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊ शकला नाही. त्यांनी क्षेत्ररक्षण करतानाही अनेक सोपे झेल सोडले. या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीने मोठे वक्तव्य केले आहे.