Virat Kohli shared a picture with his daughter Vamika: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी) ने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२३ मध्ये आपल्या प्रवासाची शानदार सुरुवात केली, परंतु त्यानंतर सलग दोन सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सोमवारी रात्री आरसीबीचा एलएसजीने शेवटच्या चेंडूवर एका विकेटने पराभव केला. या सामन्यात विराट कोहली, कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी आरसीबीसाठी अर्धशतके झळकावली, मात्र गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर दुसऱ्याच दिवशी विराट कोहलीने मुलगी वामिकासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

विराटने आपल्या मुलीसोबतचा एक क्यूट फोटो शेअर केला –

स्विमिंग पूलच्या बाजूला विराट कोहली त्याची मुलगी वामिकासोबत बसलेला आहे. विराटने फोटो शेअर करताच, हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. कोहलीने हा सुंदर फोटो हार्ट इमोजीसह शेअर केला आहे. विराट-अनुष्काने याआधीही वामिकासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, मात्र ते कधीही आपल्या मुलीचा चेहरा दाखवत नाहीत, यावेळीही विराटकडून याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ

लखनऊविरुद्ध अनुष्का शर्मा चीअर करताना दिसली –

१० एप्रिलला विराट कोहली लखनऊविरुद्ध खेळत असताना त्याचे कुटुंबीयही स्टेडियममध्ये आले होते. पत्नी अनुष्का शर्मा स्टेडियममध्ये कोहली आणि टीमचा जयजयकार करत होती, विराटनेही ६१ धावांची शानदार खेळी केली, मात्र मोठी धावसंख्या उभारुनही आरसीबीला सामना जिंकता आला नाही.

सोमवारी झालेल्या लखनऊ आणि बंगळुरु सामन्याबद्दल बोलायचे, तर या सामन्यात लखनऊने आरसीबीचा एका विकेटने पराभव करत सामना जिंकला. या विजयासह लखनौचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २ बाद २१२ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊने ९ गडी गमावून २१३ धावा केल्या आणि सामना जिंकला.

हेही वाचा – IPL 2023: सर्वाधिक धावा, तरीही आयपीएलचा ‘हा’ लज्जास्पद विक्रम विराट कोहलीच्या नावावर; जाणून घ्या कोणता आहे?

या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना चमकदार कामगिरी केली. विराट कोहलीने ४४ चेंडूत ६१, ग्लेन मॅक्सवेलने २९ चेंडूत ५९ केल्या. कर्णधार फाफ डुप्लेसिसने ४६ चेंडूत नाबाद ७९ धावा केल्या. दरम्यान लखनकडून मार्क वुड आणि अमित मिश्राने प्रत्येकी एक विकेट घेतली.

Story img Loader