Gujarat Titans Enter Playoffs IPL 2023: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघ मागील वर्षापासून चांगली कामगिरी करत आहे. आयपीएल २०२३ च्या प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला. यासह गुजरात टायटन्सने मोठा विक्रम केला आहे. आयपीएल २०२३ मध्ये, गुजरात संघाने आतापर्यंत १३ सामने खेळले आहेत, त्यापैकी ९ जिंकले आहेत. त्याचवेळी ४ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत तो पहिल्या स्थानावर आहे.
गुजरात टायटन्सने केली कमाल –
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने २०२२ चे विजेतेपद पटकावले होते. आता हा संघ आयपीएल २०२२ च्या प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. गुजरात हा आयपीएलच्या इतिहासातील पाचवा संघ ठरला आहे, ज्याने गेल्या मोसमात आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर पुढील वर्षीही प्लेऑफसाठी पात्र ठरले. गुजरातपूर्वी डेक्कन चार्जेस, चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी ही कामगिरी केली आहे.
या संघांशी बरोबरी साधली –
१. डेक्कन चार्जेसने आयपीएल २००९ चे विजेतेपद पटकावले. यानंतर संघाने आयपीएल २०१० च्या प्लेऑफमध्येही स्थान मिळवले होते.
२. सीएसकेने आयपीएल २०१० चे विजेतेपद जिंकले. त्यानंतर आयपीएल २०११ च्या प्लेऑफमध्येही स्थान मिळविले. त्याचबरोबर २०११ चे विजेतेपदही मिळवले.
३. मुंबई इंडियन्सने आयपीएल २०१३ चे विजेतेपद पटकावले. त्यानंतर संघाने आयपीएल २०१४ च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवले.
४. सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०१६ चे विजेतेपद पटकावले. त्यानंतर आयपीएल २०१७ च्या प्लेऑफमध्येही स्थान मिळविले.
५. सीएसके संघाने आयपीएल २०१८ चे विजेतेपद पटकावले. त्यानंतर सीएसकेने आयपीएल २०१९ च्या प्लेऑफमध्येही स्थान मिळवले.
६. मुंबई इंडियन्सने आयपीएल २०१९ चे विजेतेपद पटकावले. त्यानंतर आयपीएल २०२० च्या प्लेऑफमध्येही स्थान मिळविले.
७. गुजरात टायटन्सने आयपीएल २०२२ चे विजेतेपद पटकावले. आता संघाने आयपीएल २०२३ च्या प्लेऑफमध्येही स्थान मिळवले आहे.
हेही वाचा – Virat Kohli: कार्तिक, सिराज आणि मॅक्सवेलसमोर आता नवीन आव्हान, कोहलीने चालाखी दाखवत वेधलं लक्ष, पाहा VIDEO
संघात स्टार खेळाडूंचा भरणा –
आयपीएल २०२३ मध्ये गुजरात टायटन्सचे खेळाडू चांगलाच खेळ दाखवत आहेत. संघाकडे शुबमन गिलसारखा उत्कृष्ट सलामीवीर आहे. गिलने आयपीएल २०२३ मध्ये गुजरातचे अनेक सामने एकट्याने जिंकवून दिले आहेत. त्याने आता आयपीएल २०२३ च्या १३ सामन्यांमध्ये एका शतकासह ५७६ धावा केल्या आहेत.
हेही वाचा – Mohammad Siraj: सरप्राईज देण्यासाठी कोहलीसह आरसीबीचे खेळाडू पोहोचले सिराजच्या घरी, VIDEO होतोय व्हायरल
याशिवाय मधल्या फळीत डेव्हिड मिलर आणि हार्दिक पांड्या आहेत. तरुण साई सुदर्शनने चांगली कामगिरी केली आहे. मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांनी वेगवान गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारली आहे. या दोन्ही खेळाडूंनी पॉवरप्लेमध्ये संघासाठी चांगली गोलंदाजी केली आहे. त्याचबरोबर राशिद खाननेही आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत.