CSK vs GT Qualifier 1 Match Updates: आयपीएल २०२३ च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव केला. या सामन्यात गुजरातने २० षटकात १७३ धावांचे लक्ष्य ठेवले होते, प्रत्युत्तरात गुजरातचा संघ १५७ धावांवर गारद झाला. त्याचबरोबर सीएसकेने धोनीच्या नेतृत्वाखाली १०व्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. या विजयानंतर एमएस धोनीने मोठी प्रतिक्रिया दिली.

सामन्यानंतरच्या सादरीकरणादरम्यान, “जेव्हा धोनीला विचारण्यात आले की सीएसके पाचवे विजेतेपद जिंकत आहे का? यावर तो म्हणाला की ‘आयपीएल स्पर्धा इतकी मोठी आहे आणि ही आणखी एक फायनल आहे. पूर्वी ८ संघ असायचे, आता ते १० झाले आहेत. मी असे म्हणणार नाही की ही आणखी एक फायनल आहे. हे दोन महिन्यांची कठोर मेहनत आहे. सर्वांनी योगदान दिले आहे. होय, मधल्या फळीला पुरेशा संधी मिळालेल्या नाहीत. जीटी हा एक उत्तम संघ आहे आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे पाठलाग केला. म्हणूनच त्यांना शेवटपर्यंत घेऊन जाण्याचा विचार केला. पण नाणेफेक हारणे चांगलेच झाले.”

Virat Kohli comes now it seems like he can be dismissed without any issues says Aakash Chopra
Virat Kohli : ‘आता असं वाटतं की विराटला कोणत्याही अडचणीशिवाय…’, भारताच्या रनमशीनबद्दल आकाश चोप्राचे मोठे वक्तव्य
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
AUS vs PAK Fans Make Fun Of Mohammad Rizwan As He Holds Pat Cummins' Hand
AUS vs PAK : ‘प्लीज मला हरवू नकोस हां…’, पॅट कमिन्सच्या हातावर हात ठेवल्याने मोहम्मद रिझवान ट्रोल, मीम्सना उधाण
AUS vs PAK Pat Cummins responding to Kamran Akmal mockery of the Australian team
AUS vs PAK : कामरान अकमलला ऑस्ट्रेलियन संघाची खिल्ली उडवणे पडले महागात; पॅट कमिन्सने दिले चोख प्रत्युत्तर, VIDEO व्हायरल
IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले
IND vs NZ Harbhajan Singh Statement
IND vs NZ : ‘भारतासाठी ‘ती’ गोष्ट शत्रू ठरतेय…’, मायदेशात पहिल्यांदाच कसोटीत व्हाइट वॉश झाल्यानंतर हरभजन सिंगचे मोठे वक्तव्य
IND vs NZ Tom Latham Statement After India clean sweep
IND vs NZ : ‘आम्ही भारतीय संघाच्या खेळण्याच्या पद्धतीबद्दल…’, ऐतिहासिक मालिका विजयानंतर टॉम लॅथमने सांगितले किवीच्या यशाचे गुपित
PCB Chairman Mohsin Naqvi on Champions Trophy 2025 Said Will Try to make the Visa Issuance Policy Brisk For Indian Fans
Champions Trophy: भारत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात येण्यासाठी PCBची अनोखी योजना, भारतीय चाहत्यांसाठी आखली नवी कल्पना

अशा खेळपट्टीवर जड्डूला फटकेबाजी करणे अवघड –

चेपॉकच्या खेळपट्टीबाबत महेंद्रसिंग धोनी म्हणाला की, “जड्डूला अशी परिस्थिती मिळाली, तर त्याला मदत होते. त्याच्या विरुद्ध फटकेबाजी करणे फार कठीण आहे. त्याच्या गोलंदाजीने खेळ बदलला. मोईनसोबतची त्याची भागीदारी विसरता कामा नये. आम्ही वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतो आणि वेगवान गोलंदाजाची ताकद काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतो. आम्ही त्यांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करतो. त्यांना सांगते की, ‘तुमची गोलंदाजी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करा’. आम्ही त्यांना शक्य तितके प्रेरित करण्याचा प्रयत्न करतो.”

मी खूप त्रासदायक कर्णधार आहे –

मैदानावरील त्याच्या भूमिकेबद्दल एमएस धोनी म्हणाला की, “मी खूप त्रासदायक कर्णधार आहे असे काही जणांना वाटू शकते कारण, सामन्यादरम्यान फिल्डिंग लावताना त्यात सतत मागे-पुढे बदल करत राहतो. क्षेत्ररक्षकांना माझी एकच विनंती असते की, माझ्यावर इशाऱ्यांवर लक्ष ठेवा. जर एखादा झेल सोडला तर कोणतीही प्रतिक्रिया माझ्याकडून येणार नाही, फक्त मी काय सांगतो त्याकडे लक्ष ठेवा.”

हेही वाचा – GT vs CSK Qualifier 1: धोनी-जडेजाच्या रणनीतीपुढे गुजरात फेल! १५ धावांनी शानदार विजय मिळवत चेन्नई फायनलमध्ये दाखल

पुढचा सीझन खेळण्यावर धोनी काय म्हणाला?

पुढील हंगामात खेळण्याच्या प्रश्नावर एमएस धोनी म्हणाला की, “मी आयपीएल खेळणार की नाही, मला माहित नाही. हा निर्णय घेण्यासाठी माझ्याकडे आणखी ८-९ महिने आहेत. मग त्याचा विचार आतापासून का करायचा? मी खेळेन किंवा नाही याबाबत आत्ताच सांगू शकत नाही. मात्र, नेहमीच सीएसकेसाठी उपस्थित राहीन.”