चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२३चे विजेतेपद पटकावले आहे. पावसाने लांबलेल्या फायनलमध्ये चेन्नईने डकवर्थ-लुईस पद्धतीचा वापर करून गतविजेत्या गुजरातचा पाच गडी राखून पराभव केला. हा अंतिम सामना अंबाती रायडूच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. आयपीएल फायनल हा त्याचा शेवटचा सामना असेल असे रायुडूने फायनलपूर्वी जाहीर केले होते. सीएसकेच्या विजयानंतर रायुडू खूप भावूक दिसला आणि रडू लागला.

सीएसकेचा कर्णधार एम.एस. धोनी या सामन्यानंतर आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करेल, असे अनेकांना वाटत होते. मात्र, तसे झाले नाही. दुसरीकडे अंबाती रायुडू मात्र अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट केल्याप्रमाणे आयपीएलमधून निवृत्त झाला आहे. रायुडूची आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल कारकीर्द मोठी राहिली आहे. सोमवारी सामना संपल्यानंतर त्याने चाहते आणि निकटवर्तीयांचे आभार मानले.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Suryakumar Yadav won the hearts of fans video viral
Suryakumar Yadav : याला म्हणतात देशभक्ती… देशाचा अपमान होताना पाहून सूर्यकुमार यादवने केलं असं काही की, तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’

अंबाती रायडूला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही कारण त्याने आपली कारकीर्द एका चांगल्या, भव्य विजयी नोटवर संपवली. रायुडूने गुजरातविरुद्ध दडपणाखाली एक चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ८ चेंडूंत १९ धावांची खेळी खेळली. त्याने मोहित शर्माच्या चेंडूवर तिन्ही चौकार लगावले आणि चेन्नईला दबावातून बाहेर काढले. सामन्यानंतर रायडूने सांगितले की, “महेंद्रसिंग धोनीने त्याच्या फलंदाजीचे कौतुक केले.”

हेही वाचा: IPL 2023 Champion CSK: २ चेंडू १० धावा! सामना जिंकताच धोनीने जड्डूला उचलले; थालाचे डोळे पाणावले, विजयानंतरच्या भावनिक क्षणांचा Video व्हायरल

चेन्नईचा स्टार खेळाडू रायुडू म्हणाला, “जेव्हा शेवटच्या दोन चेंडूंवर १० धावांची गरज होती, तेव्हा आम्ही सर्वजण डगआउटमध्ये आमच्या देवाची आठवण करत होतो. शेवटी एक परीकथेचा शेवट झाला. मी आणखी काही मागू शकलो नसतो. हे अविश्वसनीय आहे. या लीगमधील काही सर्वोत्कृष्ट संघांविरुद्ध खेळणे मी खरोखर भाग्यवान आहे. हा विजय मला आयुष्यभर लक्षात राहील.”

रायुडू पुढे म्हणाला, “गेल्या ३० वर्षातील माझ्या मेहनतीमुळे मला आनंद आहे की या नोटवर माझे करिअर संपले. मी माझ्या कुटुंबाचे आणि माझ्या वडिलांचे आभार मानण्यासाठी हा क्षण घेऊ इच्छितो. त्यांच्याशिवाय मी आज इथे नसतो. जेव्हा आम्ही सामना जिंकलो तेव्हा धोनी मला म्हणाला होता की, हे शॉट्स तुम्हाला म्हातारे झाल्यावरही आठवतील.”

हेही वाचा: IPL 2023 Champion CSK: चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर जडेजाने रिवाबाला अन् धोनीने साक्षीला मारली मिठी, फॅमिली इमोशनचा Video व्हायरल

सामना संपल्यानंतर रायुडू पुढे म्हणाला, “हा एका अध्यायाचा शेवट आहे. मी अजून मागू शकत नाही. मला एका महान संघाकडून खेळण्याची संधी मिळाली, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. आता मी आयुष्यभर हसू शकतो. मागच्या ३० वर्षांमध्ये मी जेवढी मेहनत घेतली, त्याचा शेवट अशा पद्धतीने झाला, याचा आनंद आहे. मी खरोखर माझे कुटुंब आणि खासकरून वडिलांना धन्यवाद म्हणू इच्छितो. त्यांच्याशिवाय हे साध्य होऊ शकले नसते.”

सामन्यात काय झाले?

दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर सीएसकेला विजयासाठी गुजरातकडून २१५ झावांचे लक्ष्य मिळणार होते. पण स्टेडियममध्ये पाऊस आल्यामुळे पंचांकडून सीएसकेला विजयासाठी १५ षटकांमध्ये १७१ धावांचे लक्ष्य मिळाले. रवींद्र जडेजा याने शेवटच्या दोन चेंडूंवर लागोपाठ षटकार आणि चौकार मारल्यामुळे सीएसकेने सामना जिंकला. अंबाती रायुडू देखील ८ चेंडूत १९ धावांचे योगदान देऊ शकला. रायुडूने सीएसकेच्या डावातील १३व्या षटकात पहिल्या तीन चेंडूंवर दोन षटकार आणि चौकार मारला, पण चौथ्या चेंडूवर झेलबाद देखील झाला.