Sachin Tendulkar on ODI Cricket: एकदिवसीय क्रिकेट धोक्यात आले आहे… एकदिवसीय क्रिकेट फलंदाजांचा फॉरमॅट झाला आहे… एकदिवसीय क्रिकेटकडे लक्ष देण्याची गरज आहे… या गोष्टी भारतातील क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका खेळाडूने सांगितल्या आहेत. आम्ही बोलतोय सचिन तेंडुलकरबद्दल ज्याने वनडे क्रिकेटच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सचिनने त्याच्या ५० व्या वाढदिवसापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधील मोठ्या बदलाविषयी सांगितले.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा २४ एप्रिलला वाढदिवस आहे. या क्रिकेटपटूचा सोमवारी ५० वा वाढदिवस आहे. त्याआधी त्याने मीडियाशी संवाद साधला. ज्यामध्ये त्याने एकदिवसीय क्रिकेटच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या फॉरमॅटकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सचिनने सांगितले.

Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?
India Former Prime Minister Dr. Manmohan Singh Funeral Live Updates in Marathi
Dr. Manmohan Singh Death LIVE Updates : “देशाला त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असताना ते आपल्याला सोडून गेले”, मनमोहन सिंग यांच्या निधनावर तुषार गांधींची खंत
Virat Kohli Depicted as Clown in Australian Newspaper After on-field bust up with Sam Konstas in Melbourne IND vs AUS
IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल

वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजांवर अन्याय!

सचिन तेंडुलकर म्हणाला की, एकदिवसीय क्रिकेटमध्ये कुठेतरी बॅट आणि बॉलमध्ये संतुलन नाही आहे. त्यामुळे सध्या फलंदाजांना अधिक फायदा होत आहे. सचिन म्हणाला की, वनडे क्रिकेट हे दोन नवीन चेंडूंनी खेळले जाते. म्हणजे २५ षटकांनंतर, परंतु चेंडू १२-१३ षटकांनंतरही जुना होतो. जर चेंडू जुना झाला नाही, तर गोलंदाजांना रिव्हर्स स्विंग करता येत नाही, असे सचिनने सांगितले.

‘गोलंदाजांनाही फायदा द्या’

सचिन पुढे म्हणाला की, गोलंदाजांनाही काही फायदा द्यायला हवा. बॉलर्ससाठी ३०-यार्ड वर्तुळात पाच खेळाडू देखील राहतात. सचिन पुढे म्हणाला की, याच कारणामुळे काही फिरकीपटूंना त्यांची लाइन बदलायची नसते.

हेही वाचा – IPL 2023 CSK vs SRH: एमएस धोनीने मार्करामचा झेल घेत रचला इतिहास; ‘ही’ कामगिरी करणारा बनला पहिलाच खेळाडू

नाणेफेकीमुळे सचिनला वनडे क्रिकेटमध्ये बदल हवा आहे!

नाणेफेकीने सामना बदलू शकतो म्हणून नाणेफेक काढून टाकण्याची मागणी करतो, असेही सचिन म्हणाला. सचिन म्हणाला की, वनडेमध्ये २५-२५ षटकांच्या दोन डाव असतील तर नाणेफेक गमावणाऱ्या संघालाही पुनरागमन करण्याची संधी मिळेल. सचिन सध्या मुंबई इंडियन्ससोबत आहे. त्याच्या वाढदिवसापूर्वी त्याला एक मोठी भेट मिळाली आहे. त्यांचा मुलगा अर्जुनने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. मुंबईच्या हैदराबादविरुद्धच्या विजयातही अर्जुनचा महत्त्वाचा वाटा होता.

हेही वाचा – CSK vs SRH: सीएसकेने लगावला विजयी चौकार; डेव्हॉन कॉनवेच्या शानदार खेळीच्या जोरावर चेन्नईची हैदराबादवर ७ गडी राखून मात

सचिन तेंडुलकर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा मेंटॉर

अर्जुन तेंडुलकरने आयपीएल २०२३ मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आपल्या संघ मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिल्यानंतर त्याच्या वडिलांसोबत झालेल्या संभाषणाचा खुलासा केला आहे. अर्जुनसाठी हा सामना संस्मरणीय असेल, कारण या सामन्यात त्याने आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट मिळवली. २३ वर्षीय अर्जुनने २०व्या षटकात शानदार गोलंदाजी करत आयपीएलची पहिली विकेट मिळवली. यावेळी त्याचे वडील सचिन तेंडुलकर देखील ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित होते.

Story img Loader