Sachin Tendulkar on ODI Cricket: एकदिवसीय क्रिकेट धोक्यात आले आहे… एकदिवसीय क्रिकेट फलंदाजांचा फॉरमॅट झाला आहे… एकदिवसीय क्रिकेटकडे लक्ष देण्याची गरज आहे… या गोष्टी भारतातील क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका खेळाडूने सांगितल्या आहेत. आम्ही बोलतोय सचिन तेंडुलकरबद्दल ज्याने वनडे क्रिकेटच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सचिनने त्याच्या ५० व्या वाढदिवसापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधील मोठ्या बदलाविषयी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा २४ एप्रिलला वाढदिवस आहे. या क्रिकेटपटूचा सोमवारी ५० वा वाढदिवस आहे. त्याआधी त्याने मीडियाशी संवाद साधला. ज्यामध्ये त्याने एकदिवसीय क्रिकेटच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या फॉरमॅटकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सचिनने सांगितले.
वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजांवर अन्याय!
सचिन तेंडुलकर म्हणाला की, एकदिवसीय क्रिकेटमध्ये कुठेतरी बॅट आणि बॉलमध्ये संतुलन नाही आहे. त्यामुळे सध्या फलंदाजांना अधिक फायदा होत आहे. सचिन म्हणाला की, वनडे क्रिकेट हे दोन नवीन चेंडूंनी खेळले जाते. म्हणजे २५ षटकांनंतर, परंतु चेंडू १२-१३ षटकांनंतरही जुना होतो. जर चेंडू जुना झाला नाही, तर गोलंदाजांना रिव्हर्स स्विंग करता येत नाही, असे सचिनने सांगितले.
‘गोलंदाजांनाही फायदा द्या’
सचिन पुढे म्हणाला की, गोलंदाजांनाही काही फायदा द्यायला हवा. बॉलर्ससाठी ३०-यार्ड वर्तुळात पाच खेळाडू देखील राहतात. सचिन पुढे म्हणाला की, याच कारणामुळे काही फिरकीपटूंना त्यांची लाइन बदलायची नसते.
हेही वाचा – IPL 2023 CSK vs SRH: एमएस धोनीने मार्करामचा झेल घेत रचला इतिहास; ‘ही’ कामगिरी करणारा बनला पहिलाच खेळाडू
नाणेफेकीमुळे सचिनला वनडे क्रिकेटमध्ये बदल हवा आहे!
नाणेफेकीने सामना बदलू शकतो म्हणून नाणेफेक काढून टाकण्याची मागणी करतो, असेही सचिन म्हणाला. सचिन म्हणाला की, वनडेमध्ये २५-२५ षटकांच्या दोन डाव असतील तर नाणेफेक गमावणाऱ्या संघालाही पुनरागमन करण्याची संधी मिळेल. सचिन सध्या मुंबई इंडियन्ससोबत आहे. त्याच्या वाढदिवसापूर्वी त्याला एक मोठी भेट मिळाली आहे. त्यांचा मुलगा अर्जुनने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. मुंबईच्या हैदराबादविरुद्धच्या विजयातही अर्जुनचा महत्त्वाचा वाटा होता.
सचिन तेंडुलकर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा मेंटॉर –
अर्जुन तेंडुलकरने आयपीएल २०२३ मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आपल्या संघ मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिल्यानंतर त्याच्या वडिलांसोबत झालेल्या संभाषणाचा खुलासा केला आहे. अर्जुनसाठी हा सामना संस्मरणीय असेल, कारण या सामन्यात त्याने आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट मिळवली. २३ वर्षीय अर्जुनने २०व्या षटकात शानदार गोलंदाजी करत आयपीएलची पहिली विकेट मिळवली. यावेळी त्याचे वडील सचिन तेंडुलकर देखील ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित होते.