Ajinkya Rahane’s Highest Strike Rate in IPL 2023: आयपीएल २०२३ मध्ये भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, ते पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. आयपीएलच्या १६व्या हंगामापूर्वी रहाणे अत्यंत वाईट टप्प्यातून जात होता. परंतु सीएसके संघात दाखल होताच त्याच्या फलंदाजीत मोठा बदल झाला. त्याने आक्रमक खेळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या धोनी-मॅक्सवेल सारख्या खेळाडूंनी मागे टाकत एक खास कारनामा केला आहे. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेला फलंदाज आहे.

आयपीएल २०२३ मध्ये आतापर्यंत सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेल्या फलंदाजांबद्दल बोलायचे तर, अजिंक्य रहाणे या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. रहाणेने यंदाच्या आयपीएलमध्ये १९९.०४ च्या स्ट्राईक रेटने २०९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरीही ५२.२५ इतकी राहिली आहे. त्याने आतापर्यंत दोन अर्धशतके झळकावली आहेत. रहाणेचा हा बदल पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.

Shreyas Iyer to captain Mumbai Team in Syed Mushtaq Ali Trophy Prithvi Shaw included in Squad Ajinkya Rahane
Shreyas Iyer: श्रेयस अय्यरच्या खांद्यावर ‘या’ संघाने कर्णधारपदाची दिली जबाबदारी! अजिंक्य रहाणेही अय्यरच्या नेतृत्त्वाखाली खेळणार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
maharashtra assembly election 2024 three way fight between bjp rebels jat assembly constituency
लक्षवेधी लढत : जातीयवादाकडे झुकणारी लढत
Dhananjay Munde
Dhananjay Munde : “पंकजाताईने मन मोठं केलं म्हणून…”, धनंजय मुंडेंचं परळीकरांसमोर वक्तव्य; म्हणाले, “मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी…”
MS Dhoni and wife Sakshi casting vote in Ranchi reaches new heights crowd Craze to capture video
MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीने पत्नी साक्षीसह रांचीमध्ये केले मतदान, चाहत्यांच्या गर्दीने घेरल्याचा VIDEO व्हायरल
Dharavi Assembly Constituency election Dharavi Redevelopment Mumbai print news
‘धारावी बचाव’चा कार्यकर्ता रिंगणात; मतदारसंघातून गायकवाड कुटुंबाची मक्तेदारी मोडीत काढणार ?
Challenges facing by political parties in Maharashtra state assembly elections 2024
लक्षवेधी लढत : प्रतिष्ठा, अस्तित्व आणि वर्चस्वाची लढाई

टॉप-५ यादीत एकूण ४ भारतीय –

या मोसमात सर्वाधिक स्ट्राइक रेटने धावा करणाऱ्या इतर फलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास, टॉप-५ यादीत एकूण ४ भारतीय आहेत. या यादीत ग्लेन मॅक्सवेल हा एकमेव परदेशी खेळाडू आहे. शार्दुल ठाकूरने आयपीएल २०२३ मध्ये आतापर्यंत १९८.०३ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे. धोनीने आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यात १९६.७७ च्या वेगाने धावा केल्या आहेत. या यादीतील इतर दोन खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि ध्रुव जुरेल आहेत, ज्यांनी अनुक्रमे १८८.८० आणि १८८.२३ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.

हेही वाचा – Candice Warner: डेव्हिड वार्नरची पत्नी कँडिसचा क्रिकेट ऑस्ट्रेलियावर गंभीर आरोप; म्हणाली, ‘आम्हाला…’

आयपीएल २०२३ मध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेले खेळाडू-

अजिंक्य रहाणे – १९९.०४
शार्दुल ठाकूर – १९८.०३
एमएस धोनी – १९६.७७
ग्लेन मॅक्सवेल – १८८.८०
ध्रुव जुरेल – १८८.२३

आयपीएलच्या १६व्या हंगामापूर्वी रहाणे अत्यंत वाईट टप्प्यातून जात होता. त्याला भारतीय कसोटी संघात स्थान मिळत नव्हते, तर कोलकाता नाईट रायडर्सने त्याला आयपीएल २०२२ नंतर रिलिज केले. अशा परिस्थितीत महेंद्रसिंग धोनीने या अनुभवी खेळाडूला साथ दिली. सीएसकेने आयपीएल २०२३ च्या लिलावात रहाणेला ५० लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले. आता हा खेळाडू संघाला करोडोंचा नफा देत आहे. रहाणे या हंगामात आश्चर्यकारक स्ट्राइक रेटने धावा करत आहे.