Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders IPL Match Updates : आयपीएलचा १६ व्या हंगामाताली ३३ वा सामना ईडन गार्डनमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होत आहे. कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या फलंदाजांनी केकेआरच्या गोलंदाजांचा अक्षरक्षा धुव्वा उडवला. विशेष म्हणजे सलामीला आलेला फलंदाज ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणेनं पुन्हा एकदा यंदाच्या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईच्या वानखेडे मैदानात धावांचा पाऊस पाडणाऱ्या रहाणेनं आज ईडन गार्डनमध्येही वादळी अर्धशतक ठोकलं. रहाणेनं २९ चेंडूत ७१ धावांची नाबाद खेळी साकारल्याने चेन्नईला केकेआरविरुद्ध दोनशे धावांचा टप्पा पार करता आला. रहाणेनं ५ षटकार आणि ६ चौकार ठोकून केकेआरच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्यामुळे चेन्नईनं २० षटकात ४ विकेट्स गमावत २३४ धावांपर्यंत मजल मारली.

नक्की वाचा – CSK vs KKR, IPL 2023: ईडन गार्डनमध्ये ‘अजिंक्य’ तारा चमकला! चेन्नईने केली गोलंदाजांची धुलाई, KKR ला २३६ धावांचं आव्हान

इथे पाहा व्हिडीओ

अजिंक्य रहाणे टीम इंडियात सलामीचा फलंदाज म्हणून ओळखला जातो. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून रहाणे आंतराष्ट्रीय क्रिकेटपासून बाहेर आहे. पण यंदाच्या आयपीएल हंगामात अजिंक्य रहाणेनं फलंदाजीचं रुपडं बदललं असल्याचं पाहायला मिळत आहे. मैदानात ३६० डिग्री प्लेयरप्रमाणे आजच्या सामन्यात रहाणेनं फलंदाजी केली. रहाणेचा या आक्रमक फलंदाजीची शैली पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

ऋतुराजने २० चेंडूत ३५ धावांची खेळी साकारल्याने चेन्नईला पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात मिळाली. कॉनवे अर्धशतकी खेळी करून बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणेनं मैदान गाजवलं. रहाणेनं केकेआरच्या गोलंदाजांचा समाचार घेत २९ चेंडूत ५ षटकार आणि ६ चौकार ठोकून ७१ धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे चेन्नईने २० षटकांत दोनशेचा टप्पा पार करत ४ विकेट्स गमावत कोलकाताला विजयासाठी २३६ धावांचं आव्हान दिलं आहे.