Ajit Agarkar gave a sharp reply to Virender Sehwag: दिल्ली कॅपिटल्सचा (डीसी) सलामीवीर पृथ्वी शॉ आयपीएल २०२३ मध्ये वेगवान गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करताना दिसत आहे. या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याने स्वस्तात विकेट गमावली. त्याने लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) विरुद्ध १२ धावा होत्या. तसेच, मंगळवारी गुजरात टायटन्सविरुद्ध (जीटी) ७ धावा काढून शॉ मोहम्मद शमीच्या जाळ्यात अडकला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यानंतर वीरेंद्र सेहवागने त्याच्यावर टीका केली होती. त्याला अजित आगरकरने प्रत्युत्तर दिले आहे. पृथ्वी शॉ शिवाय सरफराज खानही विशेष छाप सोडू शकला नाही. सफराजने दोन्ही सामन्यात ३४ धावा केल्या. सरफराजने जीटीसमोर ३४ चेंडूत ३० धावा केल्या, त्यामुळे त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

शुबमन गिलकडे बघा –

वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “पृथ्वी शॉनेही आपल्या चुकांमधून शिकले पाहिजे. शुबमन गिलकडे बघा, जो त्याच्यासोबत अंडर-१९ क्रिकेट खेळला आणि आता भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळत आहे. पण शॉ अजूनही आयपीएलमध्ये संघर्ष करत आहे. ऋतुराज गायकवाडनेही आयपीएलच्या एका मोसमात ६०० धावा केल्या आहेत.”अशा परिस्थितीत डीसीचे सहाय्यक प्रशिक्षक अजित आगरकर शॉच्या बचावासाठी पुढे आला आहे. कोणत्याही वैयक्तिक खेळाडूवर टीका करणे अयोग्य असल्याचे सांगत त्यांनी डीसीच्या सर्वोच्च क्रमाचा बचाव केला.

हेही वाचा – IPL 2023: खराब फॉर्मवरुन वीरेंद्र सेहवागने पृथ्वी शॉचे टोचले कान, शुबमनचं उदाहरण देत म्हणाला…

भारताच्या माजी अष्टपैलू खेळाडूने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, “त्यांनी (शॉ आणि खान) पहिल्या धावा केल्या आहेत. आम्ही बोलतोय त्या खेळाडूबद्दल (शॉ) ज्याने कसोटी पदार्पणातच शतक झळकावले होते. आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. मग एक-दोन खेळाडूंना टार्गेट का केले जात आहे.”

कोणा एकावर टीका करण्यात अर्थ नाही –

आगरकर पुढे म्हणाला, “आमच्या टॉप ऑर्डरने चांगली कामगिरी केली नाही. आम्हाला दोन्ही सामन्यांमध्ये इतर संघांप्रमाणे चांगली सुरुवात मिळाली नाही. त्यामुळे कोणा एकावर टीका करण्यात अर्थ नाही. एक संघ म्हणून आमची दोन्ही सामन्यांमध्ये कामगिरी चांगली नव्हती. चांगले परिणाम मिळविण्यासाठी आम्हाला फलंदाजी युनिट म्हणून सुधारणे आवश्यक आहे.”

हेही वाचा – MI vs RCB: ‘हेल्मेटवर मार’, रोहितने धाव घेताच आरसीबीच्या खेळाडूची घसरली जीभ, चाहत्यांचा विराटवर आरोप! पाहा VIDEO

पृथ्वी शॉच्या एकूण आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने ६५ डावांत २४.७२च्या सरासरीने एकूण १६०७ धावा केल्या आहेत. शॉच्या खात्यात एकूण १२ आयपीएल अर्धशतकं आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १४७.३ आहे. परंतु मोठी खेळी न खेळणे हे त्याच्यासाठी आणि त्याच्या फ्रँचायझी संघासाठी चिंतेचे कारण आहे. शॉची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या ९९ आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit agarkar gave a sharp reply to virender sehwag who criticized prithvi shaw in ipl 2023 vbm