LSG bought Akash Deep and DC bought Mukesh Kumar for 8 crores in IPL 2025 : आयपीएल 2025 लिलावात ‘लाल ऑफ बिहार’ मुकेश कुमार आणि आकाश दीपवर पैशांचा पाऊस पडला. लखनौने आकाश दीपला 8 कोटी रुपयांना विकत घेतले, तर दिल्लीने आरटीएमद्वारे 8 कोटी रुपये देऊन मुकेश कुमारला आपल्या संघात समाविष्ट केले. मुकेश कुमारसाठी बोली 2 कोटी रुपयांच्या मूळ किंमतीपासून सुरू झाली, सीएसकेने मुकेशला विकत घेण्यासाठी पहिली बोली लावली. पण यानंतर पंजाब किंग्जनेही बोली लावायला सुरुवात केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुकेश कुमारला विकत घेण्यासाठी सीएसके आणि पंजाबमध्ये चढाओढ पाहिला मिळाली. जेव्हा किंमत 6.50 कोटींवर पोहोचली तेव्हा चेन्नईने माघार घेतली. यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा संघ मैदानात उतरला. दिल्लीने मुकेशसाठी आरटीएमचा वापर केला. ज्या अंतर्गत पंजाब किंग्जने मुकेशसाठी 8 कोटी रुपये निश्चित केले, जे दिल्लीने स्वीकारले आणि आरटीएमअंतर्गत, दिल्लीने मुकेश कुमारचा आपल्या संघात समावेश केला.

मुकेश कुमारची आयपीएल कारकीर्द –

मुकेश कुमार हा बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील काकरकुंड गावचा रहिवासी आहे. बिहारमधून कोलकात्यात जाऊन मुकेशने आपला ठसा उमटवला. बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळून मुकेशने स्वत:ला सिद्ध केले. रिपोर्टनुसार, मुकेश कुमारचे वडील ऑटो चालवायचे. पण आता त्यांचा मुलगा भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज ठरला आहे. आत्तापर्यंत मुकेशने आयपीएलमध्ये 20 सामने खेळले असून यादरम्यान तो 29 च्या सरासरीने 24 विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला आहे. 2024 च्या पहिल्या सत्रात मुकेश दिल्ली संघाचा खेळाडू होता. या मोसमात मुकेशने 10 सामन्यांत एकूण 17 विकेट्स घेण्यात यश मिळवले होते.

हेही वाचा – Allah Ghazanfar IPL 2025 Auction : मुंबईने घेतलाय रहस्यमयी फिरकीपटू, कोण आहे अफगाणिस्तानचा नवा शिलेदार?

u

कोण आहे आकाशदीप?

आकाश दीप हा मूळचा बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील शिवसागर ब्लॉकमधील बड्डी गावचा रहिवासी आहे. आकाश दीपने कसोटीत आपल्या गोलंदाजीने आपले कौशल्य दाखवून दिले आहे. यामुळेच लखनौने त्याला आयपीएल लिलावात 8 कोटी रुपयांना विकत घेतले आणि आपल्या संघात सामील केले.

हेही वाचा – Deepak Chahar IPL 2025 : मुंबई इंडियन्सने धोनीच्या लाडक्या खेळाडूला सीएसकेकडून हिसकावलं, ‘या’ स्टार खेळाडूवर पाडला पैशाचा पाऊस

आकाश दीपने आयपीएल 2024 मध्ये फक्त एकच सामना खेळला असून एक विकेट घेण्यात त्याला यश आले आहे. याशिवाय आयपीएलमध्ये आकाश दीपने 8 सामने खेळून 7 विकेट्स आपल्या नावावर करण्यात यश मिळवले आहे. आकाश दीपने टी-20 मध्ये 49 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय आकाशने 5 कसोटी सामने खेळले असून 10 विकेट्स घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akash deep was bought by lsg and mukesh kumar by dc for 8 crores each in ipl 2025 auction vbm