Akash Madhwal becoming the first bowler to take five wickets in the playoffs: इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा एलिमिनेटर सामना मुंबई आणि लखनऊ संघात खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज आकाश मधवालने लखनऊविरुद्ध ५ विकेट घेत इतिहास रचला. प्लेऑफमध्ये ५ बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. याशिवाय लीगमध्ये सर्वात कमी धावा देऊन ५ बळी घेण्याच्या बाबतीत त्याने अनुभवी अनिल कुंबळेची बरोबरी केली. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मागे सोडले आहे.

मैदानाबाहेरही अनिल कुंबळेशी साम्य –

आकाश मधवाल मूळचा रुरकी, उत्तराखंडचा असून तो स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंतचा शेजारी आहे. आकाश आणि कुंबळे यांच्यात एक समानता आहे की, दोघेही इंजिनिअर आहेत. २०१८ च्या आधी आकाश टेनिस बॉलने क्रिकेट खेळायचा. वयाच्या २४ व्या वर्षापर्यंत त्याने कसोटी क्रिकेटच्या चेंडूला स्पर्शही केला नव्हता. मात्र ५ वर्षांनंतरची कथा पूर्णपणे वेगळी आहे. आता तो मुंबई इंडियन्समध्ये जसप्रीत बुमराहसारख्या खेळाडूंमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढताना दिसत आहे.

Novel sports Competition Rita Bullwinkle
रेंगाळत ठेवणारी मनलढाई…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Dispute over setting up kite stall two former BJP corporators clashed
पतंगाचा स्टॉल लावण्यावरून वाद, भाजपच्या दोन माजी नगरसेविका आपसात भिडल्या
Yuvraj Singh Backs Rohit Sharma Virat Kohli Amid Heavy Criticism on Poor Form
VIDEO: रोहित-विराटच्या मदतीला धावला युवराज सिंग; ट्रोलर्सचा समाचार घेताना म्हणाला…
Rashid Khan 11 Wickets career best helps Afghanistan register series win vs Zimbabwe Ramat Shah Century
AFG vs ZIM: रशीद खानची कारकिर्दीतील सर्वाेत्कृष्ट गोलंदाजी, ११ विकेट्स घेत अफगाणिस्तानला असा मिळवून दिला मालिका विजय
Gautam Gambhir Statement on Rohit sharma Virat Kohli Test Future Said Its up to Them IND vs AUS
IND vs AUS: “रोहित-विराटवर आहे काय निर्णय घ्यायचा पण…”, गौतम गंभीरचं कसोटी भविष्याबाबत मोठं वक्तव्य, मालिकेनंतर काय म्हणाला?
Yashasvi Jaiswal First Indian Batter To Score 16 Runs in 1st Over of the innings IND vs AUS
IND vs AUS: यशस्वी जैस्वालने सिडनी कसोटीत रचला नवा विक्रम, भारताच्या कसोटी इतिहासात कोणालाही जमला नाही असा पराक्रम
Ryan Rickelton scores fastest double Century for South Africa in 17 years in Test Match SA vs PAK
SA vs PAK: आफ्रिकेच्या रायन रिकेल्टनने पहिल्याच कसोटी झळकावलं ऐतिहासिक द्विशतक, WTC मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ४ विकेट्स घेतल्या होत्या –

अनकॅप्ड खेळाडू म्हणून आकाश मधवालही सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाज ठरला. त्याने अंकित राजपूतला मागे सोडले आहे. २०१८ मध्ये, अंकितने पंजाब किंग्ज (तत्कालीन किंग्ज इलेव्हन पंजाब) विरुद्ध १४ धावांत ५ बळी घेतले होते. आकाशने या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ३७ धावांत ४ बळी घेतले होते. गुजरात टायटन्सविरुद्ध ३१ धावांत ३ बळी घेतले होते.

हेही वाचा – CSK vs GT: सीएसकेने गुजरातविरुद्ध नोंदवला सर्वात मोठा विक्रम, कोणत्याच संघाला न जमलेला केला ‘हा’ पराक्रम

आकाश मधवालची आयपीएलमधील कामगिरी –

गेल्या वर्षी सूर्यकुमार यादव जखमी असताना आकाशला मुंबई इंडियन्सने संघात घेतले होते. आयपीएलमध्ये खेळणारा तो उत्तराखंड क्रिकेट संघाचा पहिला खेळाडू आहे. त्याने ७ सामन्यात २१.३ षटकात १६७ धावा देत १३ बळी घेतले आहेत. त्याने एका सामन्यात एकदा ४ तर एकदा ५ विकेट्स घेतल्या आहेत. लखनौविरुद्धच्या सामन्यात त्याने २१ चेंडू टाकले आणि ५ धावांत ५ बळी घेतले. त्याचबरोबर १७ चेंडूंत एकही धाव दिली नाही.

हेही वाचा – GT vs CSK: धोनी वेळ वाया घालवत होता आणि पंच हसत होते, का नाही केली कारवाई? ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा सवाल

सामनावीर म्हणून निवड झाल्यानंतर आकाश मधवाल काय म्हणाला?

सामनावीर ठरल्यानंतर आकाश मधवाल म्हणाला, “मी खूप सराव करत आहे आणि संधीची वाट पाहत आहे. मी इंजिनीअरिंग केले आहे, क्रिकेट ही माझी आवड आहे आणि २०१८ पासून मी या क्षणाची वाट पाहत आहे. जेव्हा आम्ही नेटमध्ये सराव करतो, तेव्हा व्यवस्थापन आम्हाला लक्ष्य देते आणि आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. येत्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्याची आशा असून चॅम्पियन व्हायचे आहे. निकोलस पूरनची विकेट माझ्यासाठी सर्वात आनंददायक होती.”

Story img Loader