एकीकडे प्लेऑफपर्यंत पोहोचण्यासाठी संघांमध्ये चुरस लागली आहे. तर दुसरीकडे सामन्यादरम्यान अनेक खेळाडू जखमी होऊन आयपीएलमधून बाहेर पडत आहेत. मुंबईचा दिग्गज खेळाडू सूर्यकुमार यादवच्या हाताला दुखापत झाल्यामुळे तो आयपीएलच्या बाहेर पडला आहे. त्यामुळे मुंबईने सूर्यकुमार यादवच्या जागेवर आकाश माधवल याला संघात घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> लियामला पाहून मुद्दाम स्ट्राईकवर आला, पण गोल्डन डकवर झाला बाद; दिल्लीच्या डेविड वॉर्नरला मोठा झटका

आकाश माधवल हा मध्यम गतीचा गोलंदाज सूर्यकुमार यादवचा बदली खेळाडू म्हणून मुंबईच्या ताफ्यात दाखल झाला आहे. मुंबई संघाने त्याला २० लाख रुपयांच्या बेस प्राईजवर खरेदी केले आहे. याआधी आकाश माधवलकडे उत्तराखंडमध्ये डोमॅस्टिक क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. त्याने १५ टी-२० क्रिकेट सामन्यांमध्ये १५ विकेट्स घेतलेल्या आहेत.

हेही वाचा >> ‘महिला टी-२० चॅलेंज’साठी BCCIकडून तीन संघांची घोषणा; मिताली राज, झुलन गोस्वामी बाहेर

“आकाशला सपोर्ट टीममध्ये सामील होण्यासाठी निवड करण्यात आली आहे. त्याने मागील काही महिन्यांमध्ये त्याची क्षमता दाखवून दिलेली आहे. याच कारणामुळे त्याला मुंबईसारख्या संघात सामील होण्याची संधी मिळाली आहे,” असे एमआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा >> केकेआरला मोठा धक्का! अजिंक्य रहाणे आयपीएलमधून बाहेर

याआधी गुजरात टायटन्सविरोधात खेळताना सूर्यकुमार यादवला डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. याच कारणामुळे त्याने विश्रांती करण्यासाठी आयपीएल सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याने या हंगामात एकूण ८ सामने खेळले असून ४३.२९ च्या सरासरीने ३०३ धावा केलेल्या आहेत.

हेही वाचा >> अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्सची शेवटची पोस्ट शेन वॉर्नवर, शेन वॉर्नची रॉड मार्शवर,२ महिन्यांत ३ दिग्गज क्रिकेटपटूंचे निधन

दरम्यान, मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला आहे. त्यामुळे या संघाकडे गमावण्यासारखे काहीही नाही. मात्र हा संघ उर्वरित सामन्यांत विरोधी संघांना पराभूत करुन त्यांना अडचणित आणू शकतो.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akash madhwal is signed by mumbai indians as replacement suryakumar yadav prd