आयपीएल सामन्यादरम्यान अभिनेत्री प्रेयसी अनुष्का शर्माशी संवाद साधल्याप्रकरणी विराट कोहली वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. याप्रकरणी बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले, ‘‘कोणताही खेळाडू हा खेळापेक्षा मोठा नसतो. कोहलीने खेळाच्या आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे, याबाबत चौकशी सुरू आहे.’’
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर दिल्ली  डेअरडेव्हिल्सविरुद्धचा सामना पावसामुळे थांबला असताना कोहलीने अतिविशेष प्रेक्षागृहात जाऊन अनुष्काची भेट घेतली होती. याबाबत ठाकूर म्हणाले, ‘‘आयपीएलच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा समितीने कोहलीकडून स्पष्टीकरण मागितले आहे. कोहलीकडून उत्तर आल्यावर आम्ही निर्णय घेऊ. खेळाचे नियम जे सांगतात, त्यानुसार चौकशी होईल. खेळापेक्षा कोणीही मोठा नसतो.’’

Story img Loader