Allah Ghazanfar sold to Mumbai Indians for IPL 2025 : आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईने अफगाणिस्तानच्या अल्लाह गझनफरला विकत घेतले आहे. तो फक्त 18 वर्षांचा आहे. गझनफरला मुंबईने 4.80 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. त्याची मूळ किंमत 75 लाख रुपये होती. गझनफरचा देशांतर्गत रेकॉर्ड चांगला राहिला आहे. यापूर्वी तो मुंबई इंडियन्सचा नेट बॉलरही होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अल्लाह गझनफरवर पहिली बोली कोलकाता नाईट रायडर्सने लावली होती. यानंतर आरसीबीही या शर्यतीत सामील झाला. पण आरसीबीने शेवटची बोली 2 कोटी रुपयांपर्यंत लावली. केकेआरने तर 4.60 कोटींची शेवटची बोली लावली होती. मात्र, शेवटी मुंबई इंडियन्सने त्याला 4.80 कोटी रुपये मोजत आपल्या ताफ्यात सामील केले.

अल्लाह गझनफरची आतापर्यंतची कारकीर्द –

अल्लाह गझनफरचा आतापर्यंतचा रेकॉर्ड चांगला आहे. तो मुंबई इंडियन्सचा नेट राहिल बॉलर आहे. त्याला व्हिसा न मिळाल्याने भारतात येऊ शकला नव्हता. पण तो आता मुंबईच्या मुख्य संघाचा भाग असेल. तो आतापर्यंत अफगाणिस्तानसाठी 8 एकदिवसीय सामने खेळला आहे. या कालावधीत 12 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने लिस्ट ए च्या 12 सामन्यात 16 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर 16 टी-20 सामन्यात 29 विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा – Deepak Chahar IPL 2025 : मुंबई इंडियन्सने धोनीच्या लाडक्या खेळाडूला सीएसकेकडून हिसकावलं, ‘या’ स्टार खेळाडूवर पाडला पैशाचा पाऊस

मुंबईने या खेळाडूंना केले खरेदी –

मुंबई इंडियन्सनेही दीपक चहरवर पैसे खर्च केले. मुंबईने त्याला 9.25 कोटी रुपयांना खरेदी केले. चहरची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. संघाने रायन रिक्लेटनला एक कोटी रुपयांना खरेदी केले. मुंबईने कर्ण शर्माला 50 लाखात आणि रॉबिन मिंजला 65 लाखांना खरेदी केले. टीमने नमन धीरसाठी आरटीएमचा वापर केला. त्याला 5.25 कोटी रुपये खरेदी केली.

हेही वाचा – Bhuvneshwar Kumar IPL 2025 Auction : आरसीबीने भुवनेश्वर कुमारसाठी उघडली तिजोरी, मूळ किमतीच्या दुप्पट किंमतीला केले खरेदी

मुंबईने या खेळाडूंना ठेवले कायम –

मुंबईने सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांना कायम ठेवले होते. राखून ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीत बुमराहचे मानधन सर्वाधिक आहे. त्याला 18 कोटी रुपये मिळतील. सूर्या आणि हार्दिक यांना समान वेतन मिळेल. त्यांचा पगार 16.35 कोटी रुपये आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allah ghazanfar sold to mumbai indians more than 4 crore ipl 2025 mega auction vbm