Ambati Rayudu angry at RCB senior players : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू गेल्या १६ वर्षांपासून पहिल्या आयपीएल ट्रॉफीची वाट पाहत आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीने आयपीएलच्या १७ व्या हंगामात पहिल्या ४ पैकी ३ सामने गमावले आहेत. या संघावर सर्वत्र टीका होत आहे. स्टार्सने जडलेल्या या संघात विराट कोहली, डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेलसारखे महान फलंदाज आहेत, तरीही संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आता अंबाती रायुडूने आरसीबीच्या वरिष्ठ फलंदाजांवर निशाणा साधताना सडकून टीका केली आहे.

याआधीही आरसीबी संघात अनेक जागतिक दर्जाचे स्टार होते, ज्यात ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स यांचा समावेश होता. मात्र आजपर्यंत या संघाला एकही आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा माजी फलंदाज अंबाती रायुडू याने वरिष्ठ खेळाडूंमुळे हा संघ विजेतेपद मिळवू शकला नसल्याचे म्हटले आहे. रायुडूने याचे उदाहरणही दिले आहे.

vasai municipal schools
“बजेट वाढवा पण शाळा सुरू करा”, स्नेहा दुबेंकडून पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
Sunil Gavaskar Statement on India Defeat
IND vs AUS: “हॉटेलच्या रूममध्ये बसून…”, सुनील गावस्कर पराभवानंतर भारतीय संघावर संतापले, रागाच्या भरात नेमकं काय म्हणाले?
ravi rana resign
अमरावती : नवनीत राणा म्‍हणतात, “…तर रवी राणा देखील राजीनामा देतील”
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?

चेन्नई सुपर किंग्जच्या चॅम्पियन संघाचा भाग असलेल्या अंबाती रायुडूने कोणत्याही खेळाडूचे नाव घेतले नाही, परंतु कदाचित तो सध्याच्या संघात समाविष्ट असलेल्या विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डुप्लेसिस या तीन वरिष्ठ खेळाडूंचा संदर्भ देत होता. आरसीबीने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोहलीने या मोसमात आतापर्यंत २०३ धावा केल्या आहेत. परंतु प्लेसिसला केवळ ६५ धावा करता आल्या असून मॅक्सवेलने केवळ ३१ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – IPL 2024 : ‘वेगाशी तडजोड नाही…’, इशांत-नवदीपने मयंक यादवला दिला महत्त्वाचा सल्ला, वेगवान गोलंदाजाने केला खुलासा

आरसीबीच्या गोलंदाज नेहमीच जास्त धावा देतात –

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना अंबाती रायुडून म्हणाला की, ‘आरसीबीच्या गोलंदाजांनी नेहमीच जास्त धावा देत आले आहेत आणि त्यांचे फलंदाज एकसंध कामगिरी करू शकत नाहीत. दबावाच्या परिस्थितीत कोण फलंदाजी करत असतात? भारताचे युवा फलंदाज आणि दिनेश कार्तिक. आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी नावं असलेल्या खेळाडूंनी दबावाचा सामना करायला हवा होता, पण मग तेव्हा ते कुठे असतात. त्यावेळी हे सर्व ड्रेसिंग रूममध्ये बसलेले असतात.’

हेही वाचा – IPL 2024 : मयंक यादवचा झंझावात कसा रोखायचा? मॅथ्यू हेडनने फलंदाजांना दिला गुरुमंत्र

१६ वर्षे झाली तरी आरसीबीची तीच जुनी अवस्था आहे –

अंबाती रायुडू पुढे म्हणाला, ‘१६ वर्षे झाली तरी आरसीबीची तीच जुनी अवस्था आहे. जेव्हा दबावाची परिस्थिती असते, तेव्हा कोणताही मोठा खेळाडू उपस्थित नसतो. सर्व युवा खेळाडू खालच्या फळीत फलंदाजी करतात तर सर्व वरिष्ठ खेळाडू वरच्या फळीत फलंदाजी करतात. यामुळेच संघाला अद्याप आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही.’ गेल्या सामन्यात आरसीबीचा एलएसजीकडून पराभव झाला होता. या सामन्यात आरसीबीचे फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. चिन्नास्वामी स्टेडियमवर विराट कोहलीचा हा १०० वा टी-२० सामना होता, जो तो संस्मरणीय बनवू शकला नाही.

Story img Loader