Sunil Gavaskar’s statement on Ambati Rayudu’s: चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) दिग्गज फलंदाज अंबाती रायुडूने नुकतेच एक ट्विट केले होते. त्यानंतर रायुडूने या ट्विटचा संबंध माजी सलामीवीर सुनील गावसकर यांच्या विधानाशी संबंध जोडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या ट्विटचा सुनील गावस्कर यांच्या वक्तव्याशी काहीही संबंध नाही, असे रायडूने म्हटले आहे. रायुडूच्या मते तो गावसकर यांच्या मताचा खूप आदर करतो.
वास्तविक हा हंगाम अंबाती रायुडूसाठी फारसा चांगला राहिला नाही. तो अनेक डावांमध्ये फ्लॉप ठरला आहे. चेन्नई सुपर किंग्जने त्याचा या हंगामात प्रभावशाली खेळाडू म्हणून वापर केला आहे. मात्र, तो तसा प्रभाव पाडू शकलेला नाही. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या गेल्या सामन्यात तो येताच दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर त्याच्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले.
तसेच मागच्या सामन्यात रायुडू शून्यावर बाद झाल्यानंतर कॉमेंट्री करणाऱ्या सुनील गावसकरने मोठं वक्तव्य केलं होतं. रायुडूबद्दल गावसकर म्हणाले होते की, “जर तो प्रभावशाली खेळाडू म्हणून खेळायला येत असेल, तर त्याने काही काळ मैदानात क्षेत्ररक्षणही करावे.” गावस्कर यांच्या मते, फक्त फलंदाजी करून तुम्ही मोठी धावसंख्या करू शकणार नाही. कारण तुमचे शरीर सामन्यासाठी तयार होणार नाही. म्हणूनच स्वतःला वॉर्म-अप करणे महत्त्वाचे आहे.
त्याचवेळी रायुडूने त्याच्या खराब फॉर्मबद्दल एक ट्विट केले. ज्यामध्ये त्याने सांगितले की, तो सतत मेहनत करत आहे, तरीही त्याला त्यानुसार यश मिळत नाही.
माझ्या या ट्विटचा सुनील गावस्कर यांच्या विधानाशी संबंध जोडू नये – अंबाती रायडू
त्याचे ट्विट सुनील गावस्कर यांच्या विधानाशी जोडले गेले होते. ज्यात त्यांनी रायडूवर टीका केली होती. अंबाती रायुडूने याचा इन्कार केला असला तरी आपल्या ट्विटचा सुनील गावस्कर यांच्या विधानाशी संबंध जोडू नये असे म्हटले आहे. हे त्यांचे स्वतःचे मत आहे.
तो दुसर्या ट्विटमध्ये म्हणाला, “काय हा मूर्खपणा आहे. माझ्या ट्विटचा गावसकर यांच्या विधानाशी काहीही संबंध नाही. मी त्यांच्या मताचा आदर करतो आणि ते माझ्या क्षेत्ररक्षणाबाबत होते. पण एखादा खेळाडू तो फिल्डिंग करणार की नाही हे ठरवत नाही.