Amit Mishra and Rohit Sharma Funny Video : मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स आयपीएल २०२४ मधील ४८व्या सामन्यात आमनेसामने आले होते. ज्यामध्ये लखनऊने ४ गडी राखून रोमांचक विजय नोंदवला. या सामन्यानंतरचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा लखनऊचा गोलंदाज अमित मिश्रासोबत मस्ती करताना दिसत आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यात मिश्रा खेळला नाही. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा, अमित मिश्रा आणि मुरली कार्तिक देखील उभे आहेत, जिथे रोहित त्याच्या वयाबद्दल बोलताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्माने मंगळवारी ३० एप्रिल रोजी आपला ३७वा वाढदिवस साजरा केला. तसेच अमित मिश्रानेही वयाची ४१ वर्षे ओलांडले आहेत. रोहित शर्माने अमित मिश्राला विचारले की त्याचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त आहे का? मिश्राने होकारार्थी मान डोलावली तेव्हा हिटमॅनला विश्वास बसत नव्हता की तो त्याच्यापेक्षा ३-४ वर्षांनी मोठा आहे. अनुभवी गोलंदाज अमित मिश्राने जेव्हा मी ४१ वर्षांचा झाल्याचे सांगितले, तेव्हा मिश्रा आणि कार्तिकने जेव्हा रोहितने हास्यास्पद पद्धतीने ‘हे ​​यार’ म्हटले, तेव्हा त्यांना हसू आवरता आले नाही. मिश्रा यांनी सांगितले की, त्याने वयाच्या २०-२१ व्या वर्षी पदार्पण केले होते. दोन्ही दिग्गज खेळाडूंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अमित मिश्राने कधी पदार्पण केले होते?

अमित मिश्राने २००३ साली भारतीय संघात पदार्पण केले. त्यावेळी त्याचे वय अवघे २० वर्षांचे होते. बांगलादेशने २००३ टीव्हीएस कपचे आयोजन केले होते, ज्यामध्ये भारत, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका संघ सहभागी झाले होते. अमित मिश्राने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या सामन्यात मिश्राने ५ षटकात २९ धावा देत १ विकेट घेतली होती. त्याने भारताकडून २२ कसोटी सामने खेळताना ७६ विकेट घेतल्या आहेत. त्याने ३६ एकदिवसीय सामन्यात ६४ आणि ८ टी-२०सामन्यात १४ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा – गटबाजीने बिघडवला सर्व खेळ! विश्वविजेत्या कर्णधाराने उलघडले मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूमचे ‘रहस्य’

स्टॉइनिसने बजावली महत्त्वाची भूमिका –

मार्कस स्टॉइनिसने या सामन्यात दमदार कामगिरी केली. त्याने मुंबईविरुद्ध ३९ चेंडूत अर्धशतक झळकावले. या मोसमातील त्याचे हे दुसरे शतक आहे. मुंबईविरुद्ध तो ४५ चेंडूंत ६२ धावांची तुफानी खेळी खेळून बाद झाला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून सात चौकार आणि दोन षटकार आले. लखनऊसाठी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या निकोलस पुरनने संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने डावाच्या १९व्या षटकात क्रुणाल पंड्यासोबत १० धावा देत संघाला विजयाच्या जवळ नेले. अखेरच्या षटकात संघाने चार चेंडू शिल्लक असताना विजयाची नोंद केली. या सामन्यात मुंबईकडून हार्दिक पांड्याने दोन तर तुषारा, कोएत्झी आणि नबी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit mishra taking a spin on rohit sharmas age after the lsg vs mi match went video viral vbm