Ananya Pandey Celebrates Rinku Singh Batting : आयपीएल २०२३ मध्ये एकाहून एक रंगतदार सामने होत आहेत. गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यात धावांचा पाऊस पडला. गुजराने दिलेलं २०५ धावांचं लक्ष्य रिंकू सिंगच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर कोलकाताने पूर्ण केलं. कोलकातने ३ विकेट्स राखून २०७ धावा करत या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात एक जबरदस्त रोमांच पाहायला मिळाला. रिंकू सिंगने शेवटच्या षटकात पाच षटकार ठोकून हा सामना खिशात घातला. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रिंकू सिंगचा झंझावात पाहिल्यानंतर अभिनेता शाहरुख खान आणि त्याची मुलगी सुहान खानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रिंकू सिंगचं कौतुक केलं. तसंच बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडेनंही इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत रिंकू सिंगला किंग म्हटलं आहे.

सुहानानेही स्टोरी शेअर करत रिंकूवर स्तुतीसुमने उधळली होती. ‘असाधारण’ असं कॅप्शन देत सुहानाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. इंडियन प्रीमियर लीगमध्ये रविवारी डबल हेडरचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात महामुकाबला झाला. या सामन्यात रिंकू सिंगने आक्रमक फलंदाजी करून इतिहास रचला.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Kal ho naa ho
“तिथे उपस्थित असलेल्या…”, ‘त्या’ सिनेमातील शाहरुख खानच्या मृत्यूच्या सीनबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”

नक्की वाचा – …अन् सनरायझर्स हैद्राबादची मालकीण काव्या मारन कॅमेरामनवर भडकली, १९ व्या षटकात नेमकं काय घडलं? पाहा Video

गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत रिंकू सिंगने पाच लगातर षटकार ठोकून कोलकाताला सामन्यात विजय मिळवून दिला. त्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रिंकूच्या वादळी खेळीचं कौतुक केलं. कारण रिंकूने पाच षटकारांच्या जोरावर नवीन पाच विक्रमांना गवसणी घातलीय. रिंकूने २१ चेंडूत १ चौकार आणि ६ षटकार ठोकून ४८ धावांची नाबाद खेळी केली. कोणत्याही फलंदाजासाठी हे पाच विक्रम मोडणे भविष्यात एक मोठं आव्हानच असणार आहे.