Andre Russell Hits Sixes Video Viral : आयपीएल २०२३ चा ३९ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात ईडन गार्डनमध्ये रंगला. कोलकाताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ६ विकेट्स गमावत १७९ धावांपर्यंत मजल मारली होती. परंतु, गुजरातचे धडाकेबाज फलंदाज शुबमन गिल, विजय शंकर आणि डेव्हिड मिलरने अप्रतिम फलंदाजी करून गुजराला या सामन्यात विजय मिळवून दिला. गुजरातने सामना जिंकला पण चर्चा मात्र आंद्रे रसेलच्या गगनचुंबी षटकरांची होत आहे. आंद्रे रसेलचा आजा वाढदिवस आहे. अशातच रसेलने कोलकातासाठी जबरदस्त खेळी केली. रसेलने १९ चेंडूत ३ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीनं ३४ धावा कुटल्या. रसेलच्या षटकारांचा व्हिडीओ इंडियन प्रीमियर लीगच्या ट्वीटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे.
गुजरात टायटन्ससाठी ऋद्धीमान साहाने फक्त १० धावा केल्या. गुजरातचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने चौफेर फटकेबाजी करत ३५ चेंडूत ४९ धावा केल्या. तर कर्णधार हार्दिक पांड्या २० चेंडूत २६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर विजय शंकर आणि डेव्हिड मिलरने कोलकाताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. कोलकातासाठी सुनील नारायण, हर्शीत आणि आंद्रे रसलने प्रत्येकी एक विकेट घेतली.
इथे पाहा व्हिडीओ
कोलकाताचे सलामीवीर फलंदाज एन जगदिशन आणि गुरुबाजने चांगली सुरुवात केली होती. मात्र, तिसऱ्याच षटकात मोहम्मद शमीने जगदिशनला १९ धावांवर बाद केलं आणि कोलकाताला पहिला धक्का बसला. परंतु, त्यानंतर गुरुबाजने चौफेर फटकेबाजी करत मैदानात धावांचा पाऊस पाडला. गुरुबाजने ३९ चेंडूत ८१ धावांची खेळी साकारली. नूर अहमदच्या गोलंदाजीवर गुरुबाज बाद झाला आणि केकेआरला मोठा धक्का बसला. शामीने शार्दुल ठाकूरला शून्यावर बाद केलं. त्यानंतर जोशूआ लिटिलने व्येंकटेश अय्यरला ११ धावांवर बाद केलं. कर्णधार नितीश राणालाही ४ धावांवर असताना लिटिलने झेलबाद केलं. रिंकू सिंग १९ धावांवर असताना नूर अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर मोहम्मद शामीने आंद्रे रसलला ३४ धावांवर बाद केलं.