Anil Kumble Predictions on IPL 2023 Playoffs: आयपीएल २०२३ चा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या हंगामाचा दुसरा हाफ सुरू झाला असून गुणतालिकेत पुढे जाण्यासाठी संघांमधील स्पर्धा सुरूच आहे. गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स वगळता सर्व संघांनी ८-८ सामने खेळले आहेत. गुणतालिकेत सध्या चार संघ १०-१० गुणांवर आहेत, तर दोन संघ ८-८, दोन संघ ६-६आणि इतर दोन संघ ४-४ गुणांवर आहेत. अशा परिस्थितीत कोणते ४ संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील हे ठरवणे थोडे कठीण आहे. पण या प्रश्नावर भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेने मोठी भविष्यवाणी केली आहे.

कुंबळेने आयपीएल २०२३ च्या प्लेऑफसाठी पात्र ठरणाऱ्या चार संघांबद्दल सांगितले आहे. भारताचा दिग्गज फिरकीपटू कुंबळेच्या मते, सध्या गुणतालिकेत जे अव्वल ४ संघ आहेत, तेच प्लेऑफविरुद्ध खेळताना दिसतील. आयपीएल २०२३ च्या ३८ व्या सामन्यानंतर, राजस्थान रॉयल्स पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे, तर त्यांच्या व्यतिरिक्त लखनऊ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ टॉप-४ मध्ये आहेत.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या... (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP President Election : भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या…
IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
Best Web Series of 2024
२०२४ मधील गाजलेल्या वेब सीरिजची यादी, तुम्ही पाहिल्यात का ‘या’ कलाकृती?
UPSC CSE Mains Result 2024 : यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर; ‘येथे’ ऑनलाइन पाहा निकाल
no final decision on how many ministerial posts will be distributed to BJP Shiv Sena and NCP print politics news
मंत्र्यांच्या संख्येवरून महायुतीत चर्चा सुरूच

१६ गुण असूनही प्रकरण नेट रन रेटवर अडकू शकते –

जिओ सिनेमाचे आयपीएल एक्सस्पर्ट अनिल कुंबळे यांनी माध्यमाशी संवाद साधताना लाइव्ह हिंदुस्तानने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला, “तेथे कोण असेल हे सांगणे खूप कठीण आहे, पण मी म्हटल्याप्रमाणे प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी किमान १६ गुणांची आवश्यकता असेल. जर तुम्हाला १६ गुण मिळाले नाहीत, तर १४ गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचणे खूप कठीण होईल. जर तुम्हाला १४ गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर नेट रन रेट खूप महत्त्वाचा असणार आहे. यावेळी, १६ गुण असूनही प्रकरण नेट रन रेटवर अडकू शकते. कारण या वेळी १६ गुण मिळवूनही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील की नाही याची खात्री देता येईल, असे वाटत नाही.”

हेही वाचा – IPL 2023 PBKS vs LSG: काइल मेयर्सचा गगनचुंबी षटकार पाहून लखनऊचेही खेळाडू आश्चर्यचकित, पाहा VIDEO

सध्याचे चार अव्वल संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार –

तो पुढे म्हणाला, “माझ्या मते, जे संघ सध्या टॉप- ४ मध्ये आहेत, ते प्लेऑफसाठी पात्र ठरतील. बाकी संघांना तिथे पोहोचणे थोडे कठीण जाईल. हे चारही संघ सध्या फॉर्मात आहेत. तसेच त्यांच्यात क्षमता आहे. त्यांनी घरच्या आणि बाहेरच्या दोन्ही मैदानावरही सामने जिंकले आहेत. केवळ घरच्या मैदानावरील सामने जिंकून तो इथपर्यंत पोहोचले आहेत, असे नाही. त्यामुळे जे संघ सध्या टॉप-४ मध्ये आहेत, तेच संघ शेवटपर्यंत येथे उपस्थित राहतील, असे मला वाटते.”

हेही वाचा – IPL 2023 PBKS vs LSG: लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का! ‘या’ स्टार खेळाडूला दुखापत झाल्याने वाढल्या अडचणी

या भविष्यवाणीनुसार मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज या संघांचे यंदाच्या मोसमात प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न अपूर्ण राहणार आहे. अनिल कुंबळेची ही भविष्यवाणी खरी ठरली, तर गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही तेच तीन संघ प्लेऑफमध्ये खेळताना दिसतील, जे गेल्या वेळी प्लेऑफमसाठी पात्र ठरले होते. राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांनी गेल्या वर्षीही प्लेऑफ सामने खेळले होते. फक्त यावेळी प्लेऑफच्या शर्यतीत सामील असलेल्या चार संघांमध्ये एक बदल होणार आहे, तो म्हणजे आरसीबी ऐवजी सीएसके संघ टॉप-४ मध्ये दिसेल.

Story img Loader