विश्वचषक स्पर्धेदरम्यान झालेल्या निराशाजनक कामगिरीमुळे गेल्या काही दिवसांत विराट कोहली आणि त्याची प्रेयसी अनुष्का शर्मा यांना प्रचंड टीकेचा सामना करावा लागला होता. मात्र, दुनियेची पर्वा न करता अनुष्का आणि विराट पहिल्यासारखेच एकत्र फिरताना दिसत आहेत. नुकतेच हे दोघेजण विराट खेळत असलेल्या बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्स  संघाच्या बसमधून एकत्र प्रवास करतानाची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. या छायाचित्रात विराट आणि अनुष्का एकमेकांशेजारी बसलेले दिसत आहेत आणि दोघेजणही आपआपले मोबाईल बघण्यात दंग असलेले दिसत आहेत.
विराट कोहली बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्स संघाचे कर्णधारपद भुषवत असून, त्याच्या नेतृत्त्वाखाली संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभवही केला होता. त्यावेळी अनुष्का विराटला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात उपस्थित असल्याचे दिसून आले होते.
विश्वचषकातील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यालाही अनुष्का प्रेक्षकांमध्ये उपस्थित होती. त्यावेळी विराटच्या खराब कामगिरीमुळे क्रिकेट चाहत्यांनी अनुष्कावर चांगलेच तोंडसुख घेतले होते. मात्र, या प्रसंगानंतर विराट आणि अनुष्का आणखी जवळ आल्याचे दिसून आले. काही दिवसांपूर्वीच अनुष्काने दिल्लीमध्ये विराटच्या कुटुंबियांबरोबर वेळ घालविला होता. त्यानंतर आयपीएलच्या उद्घाटन समारंभाला अनुष्काने बहारदार नृत्यही पेश केले होते.

Story img Loader