Anushka Sharma hugs and kisses Virat Kohli: आयपीएल २०२३ चा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. आयपीएलच्या १६व्या हंगामातील अंतिम सामना चेन्नई आणि गुजरात संघांत खेळला जाणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर २८ मे रोजी होणार आहे. तत्पुर्वी विराट कोहलीचा आरसीबी बाहेर पडला आहे. त्यामुळे विराट कोहली डब्ल्यूटीसी फायनलसाठी टीम इंडियासह लंडनला गेला आहे. दरम्यान आता विराट आणि अनुष्का शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
भारतीय फलंदाज विराट कोहली हा मैदानावर कितीही सभ्य दिसत असला, तरी जेव्हा तो त्याच्या मस्तीखोर शैलीत येतो, तेव्हा चाहत्यांना तो क्रिकेटचा सुपरस्टार दिसत नाही, तर त्यांच्यासारखा सामान्य माणूस वाटतो. कोहलीची ही शैली विशेषत: अनुष्का शर्मासोबत असताना दिसून येते.
कोहलीने अनुष्का शर्माला केले आश्चर्यचकित –
नुकतेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा एका इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते, जिथे त्यांना एकमेकांबद्दल प्रश्न विचारण्यात आले. अनुष्का शर्माने तिच्या चित्रपटातील एक डायलॉग बोलून दाखवला. त्यानंतर विराट कोहलीला तो पुन्हा बोलायला सांगितला. विराट कोहली अनुष्का शर्मापेक्षा एक पाऊल पुढे निघाला. अनुष्का शर्माने तिच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटाचा डायलॉग बोलताना म्हणाली, ‘प्रेम आणि व्यवसाय कधीच एकत्र होऊ शकत नाहीत. मी सिंगलच ठिक आहे.” कोहली हा डायलॉग पुन्हा बोलला नाही, तर चित्रपटात रणवीर सिंगने त्या पुढे म्हणालेला डायलॉग तिच्या पुढे बोलला.
अनुष्काने विराट कोहलीला केला किस –
अनुष्का शर्माला विश्वास बसत नव्हता की विराट कोहलीला तिच्या चित्रपटातील डायलॉग आठवतील. तिला खूप आनंद झाला, तिने हसत कोहलीला मिठी मारली आणि नंतर त्याच्या हातावर किस केला. या दोघांना पाहून चाहत्यांना हशा आणि टाळ्या आवरता आल्या नाहीत. त्याला सर्व काही आठवत असल्याचे कोहलीने उत्तर दिले.
हेही वाचा – Abu Dhabi: पृथ्वी शॉने प्रेयसी निधी तापडीयासह आयफा अवॉर्ड शोमध्ये लावली हजेरी, VIDEO होतोय व्हायरल
अनुष्का शर्माने विराट कोहलीला केले स्लेज –
यानंतर अनुष्का शर्माला विराट कोहलीला स्लेजिंग करण्यास सांगण्यात आले. २४ एप्रिल रोजी विराट कोहलीच्या टीम आरसीबीने आयपीएलची सर्वात मोठी धावसंख्या केली तेव्हा अनुष्का शर्माने कोहलीला स्लेज केले. अनुष्का म्हणाली, ‘कोहली, आज तर धावा कर. आज २४ एप्रिल आहे.’ कोहलीने उत्तर दिले, ‘तू मे, जून आणि जुलैमध्ये जितक्या धावा केल्या आहेत, त्यापेक्षा जास्त सामने मी पाहिले आहेत.’