Royal Challengers Bengaluru vs Delhi Capitals Highlights: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिल्या सात सामन्यांमध्ये केवळ एका विजयासह आयपीएल हंगामाची सुरुवात केली होती. एकेकाळी हा संघ गुणतालिकेत तळाला होता आणि स्पर्धेतून जेमतेम बाहेरच पडणार अशी चर्चा होती. पण आरसीबीने सर्वांनाच खोट पाडत प्लेऑफसाठी आपली दावेदारी ठोकली आहे. आता सलग पाच चमत्कारिक विजयांसह, आरसीबीने आपल्या पुनरागमनाचा डंका वाजवला. दिल्लीचा पराभव करत आरसीबीने प्लेऑफच्या दिशेने अजून एक पाऊल टाकले. दिल्लीविरूद्ध आरसीबीच्या विजयानंतर अनुष्का शर्माने स्टॅन्डसमधून दिलेली प्रतिक्रिया सध्या व्हायरल होत आहे.

घरच्या मैदानावर, एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळताना, RCB ने दिल्ली कॅपिटल्सचा ४७ धावांनी पराभव केला आणि गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचले आहेत . या विजयानंतर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने हात जोडून विजयाचे सेलिब्रेशन केले. तिच्या या भन्नाट सेलिब्रेशनचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. काही चाहते म्हणत आहेत की अनुष्काने आरसीबीच्या विजयासाठी देवाचे आभार मानले.

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Muramba
Video: “ज्या हातांनी मंगळसूत्र फेकलंस…”, रमा रेवाला देणार सणसणीत उत्तर; ‘मुरांबा’चा जबरदस्त प्रोमो
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’
2024 Maruti Suzuki Dzire Launch Live Updates: Prices start at Rs 6.79 lakh, to rival Honda Amaze
५ स्टार सेफ्टी रेटिंग, जबरदस्त मायलेज आणि आकर्षक लूकसह नवीन मारुती जनरेशन Dzire 2024 लाँच; पाहा किंमत
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
Aishwarya avinash narkar in front of old father reaction viral
Video: नारकर जोडप्याचा दाक्षिणात्य गाण्यावर डान्स, लेक अन् जावयाला पाहून ऐश्वर्या यांचे वडील झाले खूश, सर्वत्र होतंय कौतुक

हेही वाचा – IPL 2024: १८ धावा किंवा १८.१ षटके… आरसीबी की चेन्नई कोण गाठणार प्लेऑफ, वाचा कसं आहे समीकरण?

रजत पाटीदारच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीविरूद्ध मोठी धावसंख्या उभारली. आरसीबीच्या विजयात ३२ चेंडूंमध्ये ५२ धावांची शानदार खेळी रजतच्या बॅटमधून पाहायला मिळालीय कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली लवकर बाद झाल्यानंतर, विल जॅक्सने २९ चेंडूत ४१ धावा केल्या. यासह आरसीबीने २०षटकांत ९ बाद १८७ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीची आघाडीची फलंदाजी फळी कमकुवत दिसली आणि पहिल्या चार षटकांतच चार विकेट्स गमावल्या. स्टँड-इन कर्णधार अक्षर पटेलने ३९ चेंडूत ५७ धावा करून थोडा प्रतिकार केला, परंतु दुसऱ्या बाजूने पाठिंबा न मिळाल्याने दिल्लीचा संघ पाच चेंडू बाकी असताना १४१ धावांवर बाद झाला. यश दयालने कुलदीप यादवला त्रिफळाचीत करत दिल्लीवर आरसीबीला विजय मिळवून दिला. या विजयानंतर अनुष्का शर्माने आनंदाने उडी घेतली.

हेही वाचा- “…तर रोहितने टी-२० वर्ल्डकप संघात पंड्याची निवड होऊच दिली नसती”, माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य

आता याच मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा शेवटचा सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना प्लेऑफसाठी करो किंवा मरो असा असेल. आरसीबीने या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्धचे धावांचे आव्हान १८.१ षटकांपूर्वी पूर्ण केले तर ते प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात किंवा चेन्नईवर १८ धावांनी विजय मिळवल्यास आरसीबी प्लेऑफमध्ये धडक मारू शकते.