Anushka and Virat Dance on Punjabi Song: इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने आतापर्यंत ४ सामने जिंकले आहेत. रविवारी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने राजस्थान रॉयल्सचा ७ धावांनी पराभव केला. या सामन्यादरम्यान विराट कोहलीने अनुष्का शर्मा फ्लाइंग किस देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता अनुष्का शर्माने एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये विराट आणि अनुष्का जिम सेशनमध्ये डान्स करत आहे. हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडत आहे.
अनुष्काने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती कोहलीसोबत जिममध्ये पंजाबी गाण्यावर डान्स करत आहेत. या व्हिडिओमध्ये डान्स करताना कोहली अचानक थांबतो आणि लंगडत चालायला लागतो. त्याला लंगडत चाताना पाहून वाटते की त्या पाय मुरगळला असावा. कदाचित ही त्याची मजेदार शैली असेल. मात्र, चाहत्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली. व्हिडिओवर अनेक प्रकारच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. अनुष्काने शेअर केलेल्या व्हिडिओला १.५ दशलक्षाहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.
उल्लेखनीय म्हणजे, विराट कोहलीची आयपीएल २०२३ मध्ये आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याने ७ सामन्यात २७९ धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. फाफ डू प्लेसिस या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने ७ सामन्यात ४०५ धावा केल्या आहेत. कोहली-डुप्लेसिसचा संघही चांगली कामगिरी करत आहे. तो सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. आरसीबीने ७ पैकी ४ सामने जिंकले आहेत. तर ३ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
आरसीबीने राजस्थानचा सात धावांनी पराभव केला –
आरसीबीने राजस्थान रॉयल्सचा सात धावांनी पराभव केला आहे. यासह, संघाने यंदाच्या हंगामात चौथे स्थान मिळवले असून आठ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या राजस्थानची बरोबरी केली आहे. मात्र, उत्तम धावगतीच्या आधारावर राजस्थानचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने नऊ गडी गमावून १८९ धावा केल्या होत्या. फाफ डुप्लेसिसने ६२ आणि मॅक्सवेलने ७७ धावा केल्या. राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आणि संदीप शर्माने प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ सहा गडी गमावून केवळ १८२ धावा करू शकला. देवदत्त पडिक्कलने ५२ आणि यशस्वी जैस्वालने ४७ धावांचे योगदान दिले. शेवटच्या टप्प्यात ध्रुव जुरेलने १६ चेंडूत ३४ धावांची खेळी साकारली, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. आरसीबीकडून हर्षल पटेलने तीन बळी घेतले.