Anushka Sharma Video Clip Viral : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आयपीएल २०२३ मध्ये कमालीचा फॉर्ममध्ये असून मैदानात धावांचा पाऊस पाडताना दिसत आहे. सोमवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात अटीतटीचा सामना झाला. सीएसकेनं दिलेलं २२७ धावांचं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या आरसीबीचा अवघ्या ९ धावांनी पराभव झाला. विशेष म्हणजे आरसीबीचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली चेन्नईच्या आकाश सिंगच्या गोलंदाजीवर ६ धावांवर बाद झाला. आखूड टप्प्याच्या चेंडूवर फटका मारताना विराटच्या बॅटची कडा लागून चेंडू पॅडला स्पर्श करत थेट स्टंपवर लागला. त्यामुळे विराटला स्वस्तात माघारी परतावं लागलं. मात्र, विराट बाद होताच अनुष्काने भन्नाट रिअॅक्शन दिली आणि तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आकाश सिंगे कोहलीला ६ धावांवर असताना बाद केलं, त्यानंतर कॅमेरा अनुष्का शर्माच्या दिशेनं फिरवण्यात आला. विराट बाद झाल्याचं मैदानात दिसताच अनुष्कालाही मोठा धक्का बसला. तिच्यासोबत दानिश सैटलाही आश्यर्य वाटलं. विराट बाद होताच अनुष्काचे चेहऱ्यावरील हावभाव कॅमेरात कैद झाले अन् व्हिडीओ ट्वीटरवर व्हायरल झाला. विराट कोहली बाद झाल्यानंतर कर्णधार फाफ डु प्लेसिसने चेन्नईच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत ३३ चेंडूत ६२ धावा कुटल्या. पण मोईन अलीच्या गोलंदाजीवर फाफ बाद झाला आणि आरसीबीला मोठा धक्का बसला.

नक्की वाचा – विराट कोहलीला दणका! BCCI ने ठोठावला दंड, ‘या’ खेळाडूंनाही भरावा लागला लाखोंचा भुर्दंड, पाहा लिस्ट

इथे पाहा व्हिडीओ

त्यानंतर मैदानात आरसीबीची कमान सांभाळण्यासाठी माहिपाल लोमरोर मैदानात उतरला होता. परंतु, माहिपालला भोपळाही फोडता आला नाही. तो तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर बाद झाला. परंतु, त्याच्यानंतर फलंदाजीला आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने आरसीबीच्या गोलंदाजांचा अक्षरक्षा धुव्वा उडवला. मॅक्सवेलने ३६ चेंडूत ७६ धावांची वादळी खेळी केली. परंतु, माहिशच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाल्याने आरसीबीची विजयाची आशा मावळली.