Arjun took revenge of Sachin Tendulkar: इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने दमदार कामगिरी करत १४ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने शानदार गोलंदाजी केली. शेवटच्या षटकात भुवनेश्वर कुमारला बाद करून त्याने आयपीएलची पहिली विकेटही घेतली. त्याचबरोबर या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने वडिलांचा बदला घेतला आहे.

अर्जुन तेंडुलकरने वडिलांचा वर्षानुवर्षांचा बदला घेतला –

अर्जुन तेंडुलकरने शेवटच्या षटकात भुवनेश्वर कुमारला बाद करताना वडिलांचा वर्षानुवर्षे जुना बदलाही घेतला. २००८-०९ च्या रणजी हंगामात सचिन तेंडुलकर मुंबईकडून खेळत होता. त्यावेळी भुवनेश्वर कुमार १९ वर्षांचा होता आणि तो उत्तर प्रदेशकडून खेळत होता. या दोघांमध्ये झालेल्या सामन्यात सचिनसमोर गोलंदाजी करायला आलेल्या भुवनेश्वर कुमारच्या इनस्विंगरवर सचिन तेंडुलकर शून्यावर बाद झाला होता.

India Suffered Humiliating Defeat Against New Zealand on Home Ground After 12 Years What Are The Reasons IND vs NZ
IND vs NZ: रोहित-विराट अपयशी, आततायी फटकेबाजी… पुण्यात न्यूझीलंडने भारताचा विजयरथ कसा रोखला? पराभवाची ५ कारणं
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
IND vs NZ Yashasvi Jaiswal breaks Virender Sehwag's record
IND vs NZ : यशस्वीने मोडला वीरेंद्र सेहवागचा विक्रम; सीनिअर खेळाडूंची मोडली सद्दी
India vs New Zealand Pune MCA Stadium Record is Scaring Team India Looms Danger over Test Defeat Read History
IND vs NZ: एकतर्फी पराभव किंवा मोठा विजय! पुण्यातील खेळपट्टीचा रेकॉर्ड टीम इंडियाला धडकी भरवणारा, नेमका काय आहे इतिहास?
Shikhar Dhawan Shared Hilarious Video of Laddu Mutya Baba Fans React Winner of The Trend
Shikhar Dhawan: “फॅन वाले बाबा की..”, शिखर धवनलाही ‘लड्डू मुत्त्या’ ट्रेंडची पडली भुरळ, Video वर कमेंट्सचा पाऊस
Ravichandran Ashwin Creates History Breaks Most Wickets Record OF Nathan Lyon in WTC and Becomes First Player IND vs NZ
IND vs NZ: रविचंद्रन अश्विनचा WTC इतिहासात मोठा पराक्रम, नॅथन लायनचा रेकॉर्ड मोडत ठरला नंबर वन गोलंदाज
Sarfaraz Khan becomes father after wife gave birth to baby boy
Sarfaraz Khan : सर्फराझ खान झाला ‘अब्बा’जान! इन्स्टा स्टोरीवर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी
Cheteshwar Pujara broke Brian Lara's record for most first class centuries
Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराने मोडला ब्रायन लाराचा मोठा विक्रम, शतक झळकावत ठोकला टीम इंडियात पुनरागमनाचा दावा

या विकेटनंतर भुवनेश्वर कुमारच्या चर्चा सर्वत्र रंगू लागल्या. रणजी ट्रॉफीमध्ये सचिन तेंडुलकरला शून्यावर बाद करणारा भुवनेश्वर हा पहिला गोलंदाज ठरला. आता काही वर्षांनंतर जेव्हा सचिनचा मुलगा अर्जुनने भुवनेश्वरची विकेट घेतली, तेव्हा सगळ्यांना हा प्रसंग आठवला. अशात सचिन तेंडुलकरला शून्यावर बाद करणाऱ्या खेळाडूकडून अर्जुनने बदला घेतला.

सामन्याबद्दल बोलायचे, तर हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मुंबईने १४ धावांनी विजय मिळवला. सनरायझर्सचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईने २० षटकांत पाच गडी गमावून १९२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ १९.५ षटकांत १७८ धावांवर सर्वबाद झाला.

हेही वाचा – SRH vs MI: कॅमेरामनला पाहून अर्जुन तेंडुलकरने केली शिवीगाळ? काय आहे व्हायरल VIDEO पाहा

अर्जुनने मुंबईला विजय मिळवून दिला –

सनरायझर्स हैदराबादला शेवटच्या षटकात २० धावांची गरज होती. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने युवा अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजीसाठी बोलावले. अर्जुनने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत अवघ्या पाच धावा दिल्या. त्याच्या षटकात दोन विकेटही पडल्या. अब्दुल समद दुसऱ्या चेंडूवर धावबाद झाला आणि पाचव्या चेंडूवर अर्जुन तेंडुलकरने भुवनेश्वर कुमारला रोहित शर्माकडे झेलबाद करून सनरायझर्सचा डाव गुंडाळला. अर्जुनने २.५ षटकात १८ धावा दिल्या आणि एक बळी घेतला.