Arjun Tendulkar’s reaction after his first wicket:आयपीएल २०२३ मध्ये मंगळवारी अर्जुन तेंडुलकरने हैदराबादविरुद्ध मुंबईला विजय मिळवून दिला. या विजयानंतर अर्जुन तेंडुलकरने त्याच्या वडिलांसोबत झालेल्या संभाषणाचा खुलासा केला आहे. अर्जुनसाठी हा सामना संस्मरणीय असेल, कारण या सामन्यात त्याने आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट मिळवली. २३ वर्षीय अर्जुनने २०व्या षटकात शानदार गोलंदाजी करत आयपीएलची पहिली विकेट मिळवली. यावेळी त्याचे वडील सचिन तेंडुलकर देखील ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना पाच बाद १९२ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर हैदराबद संघाला १९३ धावांचे लक्ष्य दिले होते. १९३ धावांचा पाठलाग करताना हैदराबदला विजयासाठी शेवटच्या षटकात २० धावांची गरज होती. या षटकात अर्जुनने भुवनेश्वर कुमारला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यासह मुंबईने हा सामना १४ धावांनी जिंकला.

फक्त ऑफ-स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करायची –

सामन्यानंतर आपल्या कामगिरीविषयी बोलताना अर्जुन म्हणाला, “आयपीएलमध्ये पहिली विकेट घेणे माझ्यासाठी नक्कीच खूप छान होते. मला फक्त आमच्या हातात काय आहे, योजना काय आहे आणि ती कशी अंमलात आणायची यावर लक्ष केंद्रित करायचे होते. आमची योजना होती. फक्त ऑफ-स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करायची, जेणेकरून फलंदाज मैदानाच्या लांब टोकाकडे मोठे शॉट्स खेळण्याचा प्रयत्न करतील.”

हेही वाचा – IPL 2023 MI vs SRH: अर्जुनने घेतला सचिन तेंडुलकरचा बदला, वडिलांना शून्यावर बाद करणाऱ्या ‘या’ खेळाडूची घेतली विकेट

अर्जुन पुढे म्हणाला, “मला गोलंदाजी करायला आवडते, कर्णधार जेव्हा मला सांगतो, तेव्हा मला गोलंदाजी करायला आनंद होतो. मी फक्त संघाच्या योजनेवर ठाम राहण्याचा आणि माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. आम्ही (सचिन तेंडुलकर आणि अर्जुन) क्रिकेटबद्दल नेहमीच चर्चा करतो.

माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो –

अर्जुन पुढे म्हणाला, “मला गोलंदाजी आवडते, कर्णधार जेव्हा मला सांगेल तेव्हा मला गोलंदाजी करण्यास आनंद होतो. मी फक्त संघाच्या योजनेवर ठाम राहण्याचा आणि माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. आम्ही(सचिन तेंडुलकर आणि अर्जुन) क्रिकेटबद्दल बोलतो.आम्ही सामन्यापूर्वी रणनीतीवर चर्चा करतो आणि ते मला प्रत्येक सामन्यापूर्वी सराव करत राहण्यास सांगतात. मी फक्त माझ्या रिलीजवर लक्ष केंद्रित केले आणि चांगली लेन्थ आणि लाइन गोलंदाजी केली. जर स्विंग मिळाला तर तो एक बोनस आहे, जर नाही मिळाला तरी ठीक आहे.”

हेही वाचा – SRH vs MI: कॅमेरामनला पाहून अर्जुन तेंडुलकरने केली शिवीगाळ? काय आहे व्हायरल VIDEO पाहा

या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना १९२ धावा केल्या होत्या. आयपीएलमधील पहिले अर्धशतक झळकावताना कॅमेरून ग्रीनने नाबाद ६४ धावा केल्या. त्याचबरोबर तिलक वर्माने १७ चेंडूत ३७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मयंक अग्रवाल (४८ धावा) आणि हेन्रिक क्लासेन (३६ धावा) यांनी आपल्या संघाला लक्ष्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला, परंतु दोघांनाही आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही.