आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लढत होणार आहे. गुणतालकेत सर्वात शेवटी असल्यामुळे होणत्याही परिस्थितीत मुंबईला हा सामना जिंकावा लागणार आहे. आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी राहिलेल्या मुंबई संघाला अद्याप सूर गवसलेला नाही. मुंबईने सर्वच्या सर्व म्हणजेच आतापर्यंत एकूण सहा सामने गमावले आहेत. अद्याप एकही सामना जिंकता न आल्यामुळे संघात बदल करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर याला संधी मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरच अर्जुन तेंडुलकरचा एक व्हिडीओ मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

हेही वाचा >> पोलार्डच्या निवृत्तीमुळे सुनील नारायण व्यथित, म्हणाला…

या व्हिडीओमध्ये अर्जुन तेंडुलकर गोलंदाजी करताना दिसत आहे. त्याने भन्नाट यॉर्कर टाकून फलंदाजला त्रिफळाचित केलंय. त्याच्या या गोलंदाजीवर मुंबईचे चाहते फिदा झाले आहेत. अर्जुन तेंडुलकर २०२१ सालापासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे. मात्र त्याला अद्याप प्रत्यक्ष सामना खेळायला भेटलेला नाही. त्याने मुंबईच्या खेळाडूंसमोर नेटमध्ये सराव केलेला आहे. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये अर्जुनने भन्नाट गोलंदाजी करत फलंदाजाला बाद केलंय. यॉर्कच्या मदतीने अर्जुनने ही किमया साधली आहे. विशेष म्हणजे मुंबईने या हंगामात सहा सामने गमावलेले असल्यामुळे गोलंदाजी विभागात आणखी सुधारणा करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात अर्जुनला संधी मिळणार का हे पहाणे उत्सकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा >> IPL 2022, DC vs PBKS : एकट्या वॉर्नरने खेचून आणला विजय, मैदानातच केलं पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन

चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएलीच्या पंधराव्या हंगामातील ३३ वा सामना आता खेळवला जाणार आहे. आजचा सामना जिंकण्यासाठी मुंबई संघ पूर्ण ताकतीने मैदानात उतरणार आहे. आजचा सामना गमावला तर प्लेऑफ पर्यंत पोहोचण्याच्या मुंबईच्या आसा मावळतील. त्यामुळे आजचा सामना म्हणजे मुंबईसाठी करो या मरो अशीच स्थिती असेल.

Story img Loader