Arjun Tendulkar Smashes Six Video Viral : अभिनव मनोहर आणि डेविड मिलर यांनी ३५ चेंडूत ७१ धावांची भागिदारी करून गुजरात टायटन्सच्या फलकावर दोनशे धावांचा टप्पा पार केला. नूर अहमद आणि राशिद खानच्या अप्रतिम गोलंदाजीमुळं मुंबई इंडियन्सचा गुजरातविरोधात ५५ धावांनी पराभव झाला. या सामन्यात गुजरातच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. परंतु, अर्जुन तेंडुलकरच्या एका शॉटमुळं आख्खा स्टेडियममध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. अर्जुनने आयपीएल करिअरमध्ये पहिल्यांदाज फलंदाजी केली आणि मंगळवारी झालेल्या सामन्यात पहिला षटकार ठोकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्जुनने २ षटकात ९ धावा देत ऋद्धीमान साहाला बाद केलं. तर फलंदाजी करत ९ चेंडूत १३ धावा केल्या. अर्जुनने १३ धावांच्या इनिंगमध्ये एक षटकारही ठोकला. अर्जुनने मोहित शर्माच्या गोलंदाजीवर पुल शॉट मारत जबरदस्त षटकार ठोकला. मुंबईच्या इनिंगच्या २० षटकातील पहिल्या चेंडूवर मोहितने अर्जुनला बाऊंसर फेकला आणि त्या चेंडूवर तेंडुलकरने पुल शॉट मारून डीप स्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू सीमारेषेबाहेर गेला. आयपीएलमधील अर्जुनचा हा पहिला षटकार होता.

नक्की वाचा – MI vs GT, IPL 2023: राशिद-नूरच्या फिरकीचा भेदक मारा, गुजरातने केला मुंबई इंडियन्सचा दारुण पराभव

इथे पाहा व्हिडीओ

अर्जुनने मारलेल्या षटकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तेंडुलकरने मारलेला षटकार पाहून चाहत्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी डॅनी मॉरिसन कॉमेंट्री करत होते. मॉरिसनने मजेशीर अंदाजात कॉमेंट्री करत म्हटलं, ‘अर्जुन तेंडुलकर विथ ए सिक्सर’…अर्जुनने ३७ मीटरचा षटकार ठोकल्यानंतर तो फलंदाजीतही कमाल करू शकतो अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arjun tendulkar smashes 73 meter six on mohit sharma bowling watch the video of arjuns 1st six in ipl 2023 mi vs gt nss