Preity Zinta Tweet On Arjun Tendulkar : हैद्राबादविरुद्ध झालेल्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने भुवनेश्वर कुमारला बाद करून आयपीएलमधील पहिलं विकेट घेतलं. या सामन्यात मुंबई इंडियन्सने १४ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी अर्जुनवर शुभेच्छांचा वर्षाव केला. तसंच पंजाब किंग्जची मालकीण अभिनेत्री प्रीती झिंटाने अर्जुनबद्दल एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये प्रीती झिंटाने घराणेशाहीवर भाष्य केलं आहे. त्यामुळे प्रीतीचं ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. प्रीतीने ट्वीटमध्ये म्हटलंय, अनेक लोकांनी घराणेशाहीवरून अर्जुनची खिल्ली उडवली. पण त्याने आता दाखवून दिलं आहे की, स्वत:ची जागा कशी निर्माण करायची. अर्जुनला खूप खूप शुभेच्छा…सचिन तुमच्यासाठी निश्चितच अभिमानस्पद बाब आहे.”
तसंच माजी क्रिकेटर मोहम्मद कैफनेही ट्वीट केलं आहे. कैफने ट्वीट करत म्हटलं की, “अर्जुन तेंडुलकरची प्रतिष्ठा खूप वाढली आहे. कर्णधाराने ठेवलेला विश्वास अर्जुनने सार्थ ठरवून दिला. अर्जुनने आयपीएलमध्ये पहिला विकेट घेतला. अर्जुनचं खूप खूप अभिनंदन…अर्जुनला एक यशस्वी करिअर मिळावं, यासाठी प्रार्थना करतो.”
इरफान पठाननेही अर्जुन तेंडुलकरचं कौतुक करत म्हटलं, शेवटच्या क्षणी युवा खेळाडू अर्जुनने शांत राहून अप्रतिम गोलंदाजी केली. माजी वेगवान गोलंदाज इयान बिशपनेही ट्वीट करत म्हटलं. ‘ शेवटचं षटक खूपच छान होतं. हा अर्जूनचा दुसराच सामना होता. त्याने खूप चांगली कामगिरी केली.” कॅमरून ग्रीनने आयपीएलमधील पहिलं अर्धशतक ठोकलं. मुंबई इंडियन्सने मंगळवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैद्राबादला १४ धावांनी पराभूत केलं.