Nicholas Pooran and Arshdeep Singh Video: इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा ३८ वा सामना २८ एप्रिल रोजी पंजाब किंग्ज (पीबीकेएस) आणि लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) यांच्यात मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाईल. सध्या, लखनऊ सुपर जायंट्स सात सामन्यांतून चार विजयांसह आयपीएल २०२३ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे, तर पंजाब किंग्ज तितक्या सामन्यांतून आठ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
आता मोहालीतील आजचा सामना जिंकून दोन्ही संघांना आपल्या खात्यात आणखी दोन गुणांची भर घालायची आहे. दरम्यान, पंजाब विरुद्ध लखनऊ सामन्यापूर्वी, वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज निकोलस पूरन आणि भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग सरावानंतर एकमेकांशी गप्पा मारताना दिसले. अर्शदीप आणि पूरन पीबीकेएससाठी आयपीएलमध्ये एकत्र खेळले आहेत, तथापि, चालू आयपीएलमध्ये ते अनुक्रमे पंजाब आणि लखनऊ संघाचा भाग आहेत.
खरं तर, एलएसजीने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये निकोलस पूरनने अर्शदीप सिंगला पंजाब विरुद्ध लखनऊ सामन्यानंतर दाल मखनीची ट्रीट देण्यास सांगितले, ज्याला पीबीकेएस गोलंदाजाने उत्तर दिले की, जर त्याने त्याच्याविरुद्ध षटकार मारला नाही तर नक्कीच ट्रीट देणार. त्यानंतर २७ वर्षीय एलएसजी फलंदाजाने सांगितले की, तो अर्शदीपविरुद्ध कधीही षटकार मारत नाही. तो त्याच्याविरुद्ध फक्त एकेरी धाव घेत खेळतो.
पूरनने अर्शदीपचे त्याच्या जबरदस्त यॉर्कर्सबद्दल कौतुक केले आणि सांगितले की त्याला रात्रीच्या वेळी या तरुण वेगवान गोलंदाजासह पनीर बटर मसाला आणि बटर चिकन दाल मखनीसह खायचे आहे. पूरनने पीबीकेएस गोलंदाजाला विचारले, “अर्शदीप, आज रात्री तू आम्हाला दाल मखनी घेऊन येऊ शकतोस का?” ज्याला अर्शदीपने उत्तर दिले: “हो, पण जर तू मला वचन दिलेस की तू मला षटकार मारणार नाहीस तर.”
हेही वाचा – IPL 2023 PBKS vs LSG: शिखर धवनने अर्शदीप सिंग आणि हरप्रीत ब्रारसह केला भांगडा, पाहा VIDEO
त्यानंतर पूरन म्हणाला, “नक्कीच भाऊ, मी तुझ्याविरुद्ध फक्त एकेरी धाव घेतो, तुला माहिती आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तू मला यॉर्कर टाकतो, तेव्हा मी फक्त एक धाव घेतो. मग आज रात्री तू आमच्यासाठी दाल मखनी आणशील का?” सरतेशेवटी, पीबीकेएस वेगवान गोलंदाजाने दाल मखनीच्या पलीकडेही जीवन असल्याचे सांगून पूरनला ट्रोल केले.