As MS Dhoni scores 4 runs he will overtake Rohit Sharma: आयपीएल २०२३ चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी साखळी फेरीत या दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली होती. ज्यामुळे गुणतालिकेत गुजरात पहिल्या तर चेन्नई दुसऱ्या स्थानावर राहिला होता. आता महेंद्रसिंग धोनी अंतिम सामन्यात केवळ चार धावा केल्यानंतर रोहित शर्माचा एक विक्रम मोडेल.
एमएस धोनी मोडणार रोहित शर्माचा विक्रम –
महेंद्रसिंग धोनी खेळाडू म्हणून त्याची ११वी फायनल खेळणार आहे. धोनीने आतापर्यंत आयपीएल फायनलच्या १० सामन्यांमध्ये १८० धावा केल्या आहेत, ज्यात ६३ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. धोनीने आजच्या सामन्यात आणखी चार धावा केल्या, तर तो रोहित शर्माला मागे टाकेल. रोहितने आयपीएलच्या आतापर्यंत सहा अंतिम सामन्यात १८३ धावा केल्या आहेत.
आयपीएल फायनलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू –
१. सुरेश रैना – २४९ धावा
२. शेन वॉटसन – २३६ धावा
३. रोहित शर्मा – १८३ धावा
४. मुरली विजय – १८१ धावा
५. महेंद्रसिंग धोनी – १८० धावा
६. किरॉन पोलार्ड – १८० धावा
स्फोटक फलंदाजी करण्यात धोनी तरबेज –
महेंद्रसिंग धोनीची गणना जगातील सर्वोत्तम फिनिशरमध्ये केली जाते. त्याने चेन्नई सुपर किंग्जसाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. डेथ ओव्हर्समध्ये स्फोटक फलंदाजी करण्यात तो माहिर आहे. त्याने २४९ सामन्यांमध्ये ५०८२ धावा केल्या आहेत ज्यात ८४ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याचे यष्टिरक्षण कौशल्यही अप्रतिम आहे. त्याने १४१ झेल आणि ४१ स्टंपिंग केले आहेत.
सीएसके संघाने चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. सीएसकेच्या संघाने १०व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आयपीएलच्या केवळ १४ हंगामात संघ खेळला आहे. संघाकडे स्टार खेळाडूंची फौज आहे, जे अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याचा मार्ग बदलू शकतात.