IPL 2025 GT vs MI Ashish Nehra Shouted at GT Batters: मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यात आशिष नेहराचा अनोखं रूप पाहायला मिळालं. आशिष नेहरा नेहमीच आपल्या शांत स्वभावाचे ओळखला जातो. पण या सामन्यात गुजरातच्या फलंदाजीदरम्यान आशिष नेहरा जीवाच्या आकांताने रागाच्या भरात ओरडताना दिसला. मुंबई इंडियन्सने हॅटट्रिक घेतलेली पाहताच आशिष नेहरा ओरडताना दिसला.
अहमदाबादमध्ये खेळल्या जात असलेल्या सामन्यात गुजरातने शेवटच्या षटकांमध्ये तीन चेंडूत तीन विकेट गमावल्या. यामुळे नेहराचा संयम सुटला. डगआऊटमधून तो खेळाडूंवर चांगलाच ओरडताना दिसला. आशिष नेहरा हे IPL 2022 पासून गुजरातचा मुख्य प्रशिक्षक आहे.
मुंबईविरुद्धच्या सामन्यात गुजरातने १८व्या आणि १९व्या षटकात सलग तीन विकेट गमावल्या. यादरम्यान १८व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर साई सुदर्शनला पायचीत करत बाद केले. ट्रेंट बोल्टने ही विकेट घेतली. यानंतर दीपक चहरने पुढचे षटक टाकले. ज्याच राहुल तेवतिया पहिल्याच चेंडूवर धावबाद झाला. हार्दिक पंड्याच्या थ्रोमुळे त्याला खाते न उघडताच माघारी जावे लागले. पुढच्याच चेंडूवर चहरने शेरफेन रदरफोर्डची विकेट घेतली. विंडीजचा फलंदाज मोठा फटका मारत असताना लाँग ऑफवर मिचेल सँटनरकरवी झेलबाद झाला. अशाप्रकारे गुजरातने एकही धाव न जोडता तीन विकेट गमावल्या.
जेव्हा रदरफोर्ड झेलबाद झाला तेव्हा नेहरा चांगलाच संतापला. डगआऊटमधून तो ओरडताना दिसला. तो आपल्या फलंदाजांकडे बोट दाखवत होता. सलग ३ विकेट गमावल्यानंतर आशिष नेहरा चांगलाच वैतागला होता.
मुंबईविरुद्धच्या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना आठ गडी बाद १९६ धावा केल्या. साई सुदर्शनने सर्वाधिक ६३ धावांची खेळी खेळली. त्याने ४० चेंडूंचा सामना करत चार चौकार आणि दोन षटकार लगावले. त्याच्याशिवाय जोस बटलरने ३९ आणि शुबमन गिलने ३८ धावा केल्या. शेवटच्या पाच षटकांत गुजरातच्या फलंदाजीला धावा करता आल्या नाहीत. मुंबईकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक दोन विकेट घेतले.
How I cry when things don't go according to me in my life:
— Prachi Khandelwal (@PrachiK2107) March 29, 2025
?Unreal reaction Ashish Nehra ji!#GTvsMI #GTvMI #MIvsGT #IPL2025 #AshishNehra pic.twitter.com/Bxig8utYut