Ashutosh Sharma : पंजाब किंग्जचा आक्रमक फलंदाज आशुतोष शर्मा म्हणाला की, जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला स्वीप शॉट खेळणे हे नेहमीच त्याचे स्वप्न होते जे मुंबई इंडियन्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात पूर्ण झाले. आशुतोष शर्माने मुंबई इंडियन्सविरुद्ध २८ चेंडूत ६१ धावा केल्या, पण त्याचा संघ ९ धावांनी पराभूत झाला. १९२ धावा केल्यानंतर मुंबई इंडियन्सने पंजाबला १९.१ षटकात १८३ धावांवर गुंडाळलेले. त्तत्पूर्वी आशुतोष शर्माने हा सामना मुंबई इंडियन्सकडून जवळपास हिसकावून घेतला होता. मात्र, तो बाद झाल्यानंतर पंजाब किंग्ज संघाला लक्ष्य गाठता आले नाही. या सामन्यानंतर आशुतोष शर्माने आपल्या स्वप्नाबद्दल आणि कोरोना काळातील अनुभवाबद्दलही सांगितले.
सामन्यानंतर बोलताना आशुतोष शर्मा म्हणाला, “जसप्रीत बुमराहविरुद्ध स्वीप शॉट मारणे हे माझे स्वप्न होते. मी त्या शॉटचा सराव करत होतो आणि तो शॉट जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजासमोर खेळलो. संघासाठी मी सामना जिंकू शकेन, असा मला विश्वास होता.” आशुतोष शर्माने आपल्या उत्कृष्ट कामगिरीचे श्रेय पंजाब किंग्जच्या क्रिकेट विकासाचे प्रमुख आणि माजी भारतीय खेळाडू संजय बांगर यांना दिले.
‘मला संघातून काढून टाकले’ –
कोरोना काळातील अनुभव सांगताना म्हणाला, “२०१९ मध्ये मी पुद्दुचेरीविरुद्ध खेळताना माझ्या शेवटच्या सामन्यात एमपीसाठी ८४ धावा केल्या. त्यानंतर पुढच्या वर्षी, एक व्यावसायिक प्रशिक्षक आले आणि त्याच्या स्वतःच्या आवडी-निवडी होत्या. त्यांना मी आवडत नसल्याने मला संघातून काढून टाकले. या घटनेने मी प्रचंड नैराश्यात गेलो होतो. तो कोविडचा काळ होता. त्यावेळी फक्त २० लोकांना प्रवास करण्याची परवाणगी होती आणि मी हॉटेलमध्ये थांबायचो.”
‘मला मैदानही बघता आले नाही’ –
आशुतोष शर्म पुढे म्हणाला, “मी हॉटेलमध्ये एक ते दोन महिने राहिलो. मला मैदानही बघता आले नाही. मी फक्त जिममध्ये जायचो आणि परत रूमवर यायचो. मी खरोखर निराश झालो आणि नैराश्यात गेलो. हे माझ्यासाठी खूप कठीण होते. मी विचार करायचो की माझ्याकडून कुठे चूक झाली. ज्यामुळे मला न सांगता सेटअपमधून बाहेर करण्यात आले. या कारणामुळे मी कित्येक दिवस झोपू शकलो नाही.”
हेही वाचा – PBKS vs MI : तिलक वर्माचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ऋषभ पंतनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
आशुतोष शर्माने संजय बांगर यांना दिले श्रेय –
आशुतोष शर्मा म्हणाला, ‘संजय सरांनी मला सांगितले की मी स्लॉगर नाही आणि शुद्ध क्रिकेट शॉट्स खेळू शकतो. हे एक छोटेसे विधान होते, परंतु ते माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण होते. मी यावर काम करत आहे. मी हार्ड हिटर नाही आणि शुद्ध क्रिकेट शॉट्स खेळतो. मी माझ्या खेळात हा बदल केला.’ संघाच्या पराभवानंतरही आशुतोष शर्मा म्हणाला, ‘विजय आणि पराभव हा खेळाचा भाग आहे. तुम्ही एक संघ म्हणून कसे खेळत आहात हे महत्त्वाचे आहे. जर आम्ही चांगले खेळलो तर आम्ही जिंकू.