इंडियन प्रीमियर लीगचा १६वा सीझन ३१ मार्चपासून सुरू होत आहे. आयपीएल २०२३ साठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. आयपीएल २०२२ उपविजेता संघ राजस्थान रॉयल्सनेही यावेळी विजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने तयारी सुरू केली आहे. या संघाला गेल्या वर्षी अंतिम फेरीत गुजरात टायटन्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. या संघाचे सर्व अव्वल खेळाडू जयपूरमध्ये जमले आहेत. राजस्थान रॉयल्सने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये चाहते झलक दिखलाजा या गाण्याने रविचंद्रन अश्विनचे ​​स्वागत करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजस्थान संघ जयपूरच्या सवाईमान सिंग स्टेडियमवर आयपीएल २०२३ साठी तयारी करत आहे. यादरम्यान संघाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन सरावासाठी मैदानावर पोहोचला तेव्हा चाहत्यांनी अश्विनसाठी ‘झलक दिखला जा एक बार आजा आजा’ हे गाणे गायला सुरुवात केली. हे गाणे गायक हिमेश रेशमियाने गायले होते आणि ते बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे. चाहत्यांना पाहून रविचंद्रन अश्विन गंमतीने म्हणाला, “मी त्यांना घेऊन आलो आहे.” मग जेव्हा तो त्यांना गाताना ऐकतो तेव्हा तो म्हणतो “कमाल है यार”. असं म्हणत त्याने यावर थोडासा डान्स देखील केला.

आयपीएल २०२३ नवीन नियमांसह असेल

बीसीसीआयने सांगितले आहे की आयपीएल २०२३ नवीन नियमांनुसार खेळवले जाईल. आता दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीनंतर त्यांची प्लेइंग इलेव्हन निवडू शकतात. पहिल्या नाणेफेकीच्या वेळी दोन्ही कर्णधारांना त्यांचे प्लेइंग-११ घोषित करावे लागले. आता दोन्ही कर्णधारांना नाणेफेकीनंतर आयपीएल मॅच रेफरीला ११ खेळाडू आणि जास्तीत जास्त पाच पर्यायी क्षेत्ररक्षकांची नावे लिखित स्वरूपात द्यावी लागतील. याशिवाय, दोन्ही संघांना आता प्रभावशाली खेळाडू आणून सामन्याचा निकाल बदलण्याचा पर्याय असेल. यष्टिरक्षक किंवा क्षेत्ररक्षकाने अयोग्य कृती केल्यास, पंच फलंदाजी करणाऱ्या संघाला डेड बॉलसह पाच धावा दंड म्हणून देतील.

काय असेल राजस्थान रॉयल्सचा गेम प्लॉन

अश्विन हा उत्कृष्ट ऑफस्पिनर आहे. त्याच्या बॉल्समध्ये फलंदाजांना फसवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे आणि त्याचवेळी बॅट्समनला त्यांच्या मनात काय आहे हे ओळखून तो त्यांना डिस्टर्ब करून बाद करू शकतो अशी त्याच्याकडे ताकद आहे. अश्विनची गणना अत्यंत हुशार गोलंदाजांमध्ये केली जाते आणि तो आयपीएलपूर्वी त्याच्या मनाची गती ही हाताच्या गतीपेक्षा वेगाने फिरताना दिसत आहे. अश्विनने एक फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो नारळ पाणी पिताना आणि बुद्धिबळ खेळताना दिसत आहे. अश्विनच्या संघात आणखी एक बुद्धिबळ मास्टर आहे. या खेळाडूचे नाव आहे युजवेंद्र चहल. चहल क्रिकेटर येण्यापूर्वी बुद्धिबळ खेळत असे.

हेही वाचा: Shikhar Dhavan: … जेव्हा शिखर धवनने १४-१५ व्यावर्षी केली होती HIV चाचणी, टीम इंडियाच्या गब्बरने केला मोठा खुलासा

अश्विन राजस्थान रॉयल्सला विजयी करणार का?

अश्विनने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात चेन्नई सुपर किंग्जकडून केली आणि त्याच संघासह विजेतेपद पटकावले. पण नंतर तो संघ सोडून २०१८ साली पंजाब किंग्जचा कर्णधार बनला. तो या संघात दोन हंगाम खेळला, पण त्याच्या नेतृत्वाखाली संघाला यश मिळवून देता आले नाही. २०२० मध्ये अश्विन दिल्ली कॅपिटल्समध्ये गेला. तो २०२१ पर्यंत या संघासाठी खेळला आणि त्यानंतर गेल्या मोसमात राजस्थान संघात सामील झाला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashwin video jhalak dikhhla ja rajasthan royals fans sing song dance video for ashwin goes viral avw