केएल राहुलच्या फॉर्मबद्दल गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चा रंगत आहेत. राजस्थानविरुद्ध झालेल्या सामन्यात राहुलने ३२ चेंडूत ३९ धावांची खेळी केली. आश्चर्याची बाब म्हणजे राहुलला त्याचं खातं उघडण्यासाठी ७ चेंडूंचा सामना करावा लागला. सामन्यात राहुलने कमी स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. परंतु, या इनिंग दरम्यान राहुलने १०३ मीटरचा गगनचुंबी षटकार ठोकला. हा षटकार ठोकल्यानंतर राहुलची पत्नी अभिनेत्री अथिया शेट्टीचा आनंद द्विगुणीत झाला. अथियाने टाळ्यांचा गजर वाजवून आनंद व्यक्त केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

लखनऊ सुपर जायंट्सची फलंदाजी सुरु असताना युजवेंद्र चहलने ९ व्या षटकातील पाचवा चेंडू फेकला होता. त्या चेंडूवर राहुलने स्लॉग स्वीप मारून १०३ मीटर लांबीचा षटकार ठोकला. हा षटकार पाहून राहुलची पत्नी अथियाला खूपच आनंद झाला. टाळ्यांचा कडकटात करत अथियाने राहुलला चिअर अप केलं. हे सर्व दृष्य कॅमेरात कैद झाले असून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
Check Mohammad Shami Sania Mirza marriage fact check photo
मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा अडकले विवाहबंधनात? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण; पण सत्य काय? वाचा
Virat Kohli Shouts At Mohammed Siraj who is Talking to Marnus Labuschagne Said Dont Talk To Them Laughingly Video
VIDEO: “यांच्याबरोबर हसत बोलू नकोस…”, लबूशेनबरोबर बोलताना पाहून विराट कोहली सिराजला ओरडला, मैदानात नेमकं काय घडलं?
Shreyas Iyer 40 Runs Inning Made Mumbai Win in Low Scoring Match vs Hyderabad Vijay Hazare Trophy
Shreys Iyer: श्रेयस अय्यरची कमाल, ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला अन् २० चेंडूत पालटला सामना; मुंबईचा दणदणीत विजय
West Indies defeated by Indian women team sports news
भारतीय महिला संघाकडून विंडीजचा धुव्वा
Image of PM Modi And R Ashwin
PM Modi’s Letter To Ashwin : “तुझ्या कॅरम बॉलने सर्वांनाच बोल्ड केले”, अश्विनच्या निवृत्तीनंतर पंतप्रधान मोदींचे भावनिक पत्र

नक्की वाचा – अर्जुन तेंडुलकरने २४ नंबरची जर्सी घालून IPL मध्ये पदार्पण का केलं? सचिन तेंडुलकरशी खास कनेक्शन, जाणून घ्या नेमकं कारण

राहुलने त्याच्या इनिंगमध्ये चार चौकार आणि एक षटकार मारला. लखनऊच्या टीमने प्रथम फलंदाजी करून २० षटकात ७ विकेट्स गमावत १५४ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने २० षटकात ६ गडी गमावून १४४ धावा केल्या. त्यामुळे लखनऊने या सामन्यात १० धावांनी विजय मिळवला. १५५ धावांचा पाठलाग करताना राजस्थानचे सलामीवीर फलंदाज जोस बटलरने ४१ चेंडूत ४० धावा केल्या. तर यशस्वी जैस्वालने ३५ चेंडूत ४४ धावांची खेळी साकारली.

Story img Loader