आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सर्वच लढती अटीतटीच्या होत आहेत. गुणतालिकेत वरचे स्थान गाठण्यासाठी प्रत्येक संघ पूर्ण ताकतीने सामने खेळत आहे. या हंगामात अनेक नवे खेळाडू आले आहेत. आयपीएलमध्ये खेळत असल्यामुळे या नव्या खेळाडूंना आणखी नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. असे असताना आता नव्या आणि अनुभव असलेल्या जुन्या खेळाडूंच्या आयुष्यातील रंजक गोष्टी समोर येत आहेत. खेळासाठीचा संघर्ष, त्यांनी घेतलेली मेहनत खेळाडू वेगवेगळ्या माध्यमातून उत्स्फूर्तपणे मांडत आहे. दरम्यान, सध्या दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणारा फिरकीपटू अक्षर पटेलने त्याच्या नावाबद्दलची रंजक गोष्ट सांगितली आहे. शाळेच्या प्राचार्यांनी त्याच्या नावात कसा बदल केला हे अक्षर पटेलने एका कार्यक्रमात सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> माजी क्रिकेटपटूचे श्रीलंकन खेळाडूंना IPL सोडण्याचे आवाहन, म्हणाले “तिकडे…”

सध्या दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या अक्षर पटेलने ब्रेकफास्ट विथ चॅंम्पियन्स या यूट्यूब चॅनेलवर हजेरी लावली. यावेळी अक्षर पटेलने त्याच्या आयुष्यातील तसेच क्रिकेट खेळतानाच्या अनेक रंजक गोष्टी सांगितल्या. त्याचे नाव कसे बदलले याबद्दल तर त्याने खूप मजेदार माहिती दिली आहे. “माझ्या नावाचे स्पेलिंग खरं पाहायचं झालं तर Akshar असे आहे. मात्र विश्वचषकाच्या अगोदर मी बंगळुरुमध्ये अंडर १९ संघांमध्ये खेळत होतो. त्यावेळी हा संघ ऑस्ट्रेलियाला सामने खेळायला जाणार होता. विदेशात जाण्यासाठी मला प्रत्येकजण पासपोर्ट विचारत होता. पण माझ्याकडे तो नव्हता. पासपोर्ट हवा असल्यास लायसन्स आणि लिव्हिंग सर्टिफिकेट (TC) ची गरज होती. माझ्याकडे लिव्हिंग सर्टिफिकेट नव्हते. त्यामुळे मी शाळेत गेलो. पण प्राचार्यांनी माझ्या नावाचे स्पेलिंग Akshar ऐवजी Axar असे लिहिले.

हेही वाचा >>> सामन्यात हार्दिक पांड्याचा त्रागा, मोहम्मद शमीवर ऑन कॅमेरा चिडला, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

त्यानंतर तू तुझं नाव Akshar असं लिहतोस. मग लिव्हिंग सर्टिफिकेटवर Axar असे का लिहिलेले आहे, असं मला एनसीएमध्ये विचारलं गेलं. मी लगेच माझ्या वडिलांना कॉल केला. मात्र आता नावात बदल होऊ शकणार नाही, असं माझ्या वडिलांनी मला सांगितलं. त्यानंतर मी मुंबई इंडियन्स आणि भारतीय संघासाठी क्रिकेट खेळलो. सध्या सगळं सुरळीत आणि व्यवस्थित आहे. त्यामुळे माझे नाव बदलण्याच्या फंद्यात मी पडलो नाही,” असं अक्षर पटेलने सांगितले.

हेही वाचा >>> संघाचा सामन्यात पराभव पण हार्दिक पांड्या चमकला, दिग्गजांना मागे टाकत नोंदवला ‘हा’ विक्रम

त्याचबरोबर अक्षर पटेलने यष्टिरक्षक ऋषभ पंतच्या सवयीबद्दलही भाष्य केलं. “ऋषभच्या बाजुला असलेल्या खेळाडूला नेहमी सतर्क राहावं लागतं. तो कधी काय बोलेल हे सांगता येत नाही. स्टम्पसच्या मागे असताना ऋषभ वेगवेगळे आवाज काढतो. याबद्दल त्याला विचरल्यानंतर माझ्या करमणुकीसाठी मी हे करतो, असं ऋषभने सांगितलं होतं, तसेच क्षेत्ररक्षण करताना कंटाळा येऊ नये म्हणून तो नेमही काहीतरी बोलत असतो,” असंदेखील अक्षर पटेलने ऋषभ पंतबद्दल सांगितलं.