Ayush Badoni equals MS Dhoni’s record : आयपीएलच्या १७ व्या हंगामातील २६ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना झाला, ज्यामध्ये ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीने ६ विकेट्सनी सामना जिंकला. या सामन्यात लखनऊ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आयुष बडोनी आणि अर्शद खानच्या खेळीच्या जोरावर ७ बाद १६७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने १८.१ षटकांत ४ गडी गमावून १७० धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केला. या सामन्यादरम्यान आयुष बडोनी एमएस धोनीच्या एका खास विक्रमाशी बरोबरी केली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना लखनऊ संघाची सुरुवात खूपच खराब झाली. ज्यामध्ये त्यांनी ४१ धावांपर्यंत पहिल्या २ विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर ९४ धावांपर्यंत ७ विकेट्स गमावल्या होत्या. येथून, लखनऊला सामन्यात सन्मानजनक धावसंख्या उभारणे खूप कठीण दिसत होते, परंतु २४ वर्षीय युवा खेळाडू आयुष बडोनी आणि अर्शद खानसह धावसंख्या १६७ धावांपर्यंत पोहोचवली. आयुषने ३५ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५५ धावांची नाबाद खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर त्याने आयपीएलमधील एमएस धोनीच्या एका खास विक्रमाशी बरोबरी केली.
आयुष बडोनीने धोनीच्या विक्रमाशी साधली बरोबरी –
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात आयुष बडोनीला लखनऊसाठी सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात आला. त्यानंतर त्याने एका टोकाकडून डाव हाताळला आणि धावांचा वेग वाढवण्याचे काम केले. आयुषने अर्शद खानबरोबर ४२ चेंडूत ७३ धावांची भागीदारी केली. यादरम्याने त्याने ५५ धावांच्या नाबाद खेळीसह धोनीच्या आयपीएल इतिहासातील खास विक्रमाशी बरोबरी केली. आयपीएलच्या इतिहासात या सामन्यापूर्वी केवळ धोनीने भारतीय खेळाडू म्हणून सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दोनदा पन्नासहून अधिक धावांची इनिंग खेळली होती. आता आयुष बडोनीने धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली. याआधी, २०२३ च्या आयपीएल हंगामात लखनऊच्या मैदानावर सीएसकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात बडोनीने सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ५९ धावांची नाबाद खेळी केली होती.
हेही वाचा – पंड्या बंधूंना बदनामीची धमकी
आंद्रे रसेलच्या नावावर आत्तापर्यंत सर्वाधिक अर्धशतकांची नोंद –
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत ७व्या क्रमांकावर सर्वाधिक अर्धशतक झळकावण्याचा विक्रम आंद्रे रसेलच्या नावावर आहे, ज्याने ५ वेळा हा पराक्रम केला आहे. यानंतर आयुष बडोनी, पॅट कमिन्स आणि महेंद्रसिंग धोनी यांची नावे आहेत, ज्यांनी प्रत्येकी २ वेळा हा पराक्रम केला आहे. बडोनीबद्दल बोलायचे तर तो २०२२ च्या हंगामापासून लखनऊ संघाचा भाग आहे. आतापर्यंत त्याने ३३ सामन्यांमध्ये २१.९५ च्या सरासरीने ४८३ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ३ अर्धशतकांचा समावेश आहे. बडोनीने आतापर्यंत १३१.९७ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
हेही वाचा – मुलीच्या शाळेची फी भरली नाही, पण धोनीच्या चाहत्याने IPL तिकीटासाठी ६४ हजार खर्च केले
आयपीएलच्या इतिहासात हे प्रथमच घडले –
लखनऊ सुपर जायंट्ससाठी आठव्या विकेटसाठी भागीदारी करताना दोन्ही फलंदाजांनी सर्वाधिक धावा जोडल्या. आजपर्यंत आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही जोडीने आठव्या विकेटसाठी इतक्या धावा केल्या नाहीत. आयपीएलचा हा एक मोठा विक्रम आहे, जो आयुष बडोनी आणि अर्शद खानने आपल्या नावावर केला आहे. यादरम्यान आयुष बडोनीने ३५ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद ५५ धावा केल्या, तर अर्शद खानने बडोनीला साथ देताना १६ चेंडूत २० धावा केल्या. जिथे त्याने दोन चौकार मारले. दोघांनी ४२ चेंडूत ७३ धावांची भागीदारी साकारली.