Ayush Badoni Runout Video : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ४८ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. लखनऊने आपल्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर ४ विकेट्सने विजय मिळवला. अखेरच्या षटकात संघाला विजयासाठी ३ धावांची गरज होती. निकोलस पुरनने मोहम्मद नबीच्या चेंडूवर धावा करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात लखनऊचा फलंदाज आयुष बडोनी धावबाद झाल्यामुळे मोठा गोंधळ झाला. लोक या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले असून सोशल मीडियावर मीम्स शेअर करत आहेत.
किशन दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी –
शेवटच्या दोन षटकात लखनऊला विजयासाठी १३ धावांची गरज होती. मुंबईसाठी कर्णधार हार्दिक पंड्या १९ वे षटक घेऊन आला. त्याचा पहिला चेंडू आयुष बडोनीने ऑफ साइडला खेळला. तिथे उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाने धावत चेंडू पकडला आणि विकेटकीपर इशान किशनच्या दिशेने फेकला. चेंडू पकडल्यानंतर इशानने बेल्स उढवण्याचा प्रयत्न केला, पण पहिल्याच प्रयत्नात तो अपयशी ठरला. दुसऱ्या प्रयत्नात स्टंपवरील बेल्स उढवल्या.
तिसऱ्या पंचांच्या निर्णयाने बडोनी झाला चकीत –
यानंतर इशान किशन आणि मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी आयुष बडोनी धावबाद असल्याची अपील केली. त्यानंतर मैदानावरील पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे पाठवला. सुरुवातीला रिप्लेमध्ये बडोनीची बॅट क्रीजच्या आत पोहोचल्याचे दिसत होते. स्वत: फलंदाजाला याचा विश्वास होता, परंतु रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसून आले की त्याची बॅट क्रीजपर्यंत पोहोचली होती, परंतु तरीही ती हवेत होती. अशा स्थितीत त्याला धावबाद घोषित करण्यात आले. या निर्णयाने बडोनी आश्चर्यचकित झाला. यांनतर त्यांनी मैदानावरील पंचांशी चर्चा केली. पंचाने त्याच्या शंकेचे निरसन केले आणि नंतर त्याला पॅव्हेलियनमध्ये परतण्यास भाग पडले.
रोहित शर्मा आवरले नाही हसू –
किशनचे स्टंपिंग पाहून मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माही हसू आवरले. किशनला इथे नशिबाची साथ मिळाल्याचे त्याला समजले. त्यामुळे मुंबईचे अनेक खेळाडू हसताना दिसले. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावरचे हे हसू फार काळ टिकले नाही. निकोलस पुरनने शेवटच्या षटकात सामना लखनऊ सुपर जायंट्सला जिंकून दिला. तत्पूर्वी लखनऊचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईने २० षटकात ७ विकेट गमावत १४४ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौने १९.२ षटकात ६ विकेट गमावत १४५ धावा करत सामना जिंकला.