Rohit Sharma , MI vs LSG : आयपीएल २०२५ स्पर्धतील ४५ वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. डावाची सुरुवात करताना रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली.
वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला यावं लागलं. मुंबईकडून डावाची सुरूवात करण्यासाठी रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांची जोडी मैदानावर आली. या जोडीने संघाला दमदार सुरूवात करून दिली. डावाची सुरूवात करताना रायन रिकल्टनने काही आकर्षक फटके मारले. त्यानंतर रोहित शर्मा स्ट्राईकवर आला.
लखनऊ सुपर जायंट्सने या सामन्यात आपला हुकुमी एक्का मैदानात उतरवला आहे. या सामन्यात मयांक यादवला प्लेइंग ११ मध्ये संधी देण्यात आली आहे. या षटकात रोहित शर्मा मयांक यादववर भारी पडला. मयांक यादव या डावातील तिसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. या षटकातील पहिला चेंडू मयांक ने वाईड टाकला. त्यानंतर पुढील दोन्ही चेंडूवर रोहितने खणखणीत षटकार मारले. रोहित शॉर्ट चेंडूची वाट पाहत असतो आणि मयांकने दोन्ही चेंडू शॉर्ट टाकले. हे दोन्ही चेंडू त्याने स्टँड्समध्ये पोहोचवले. मात्र याच षटकात रोहितची विकेट गेली. मयांकने ऑफ साइडच्या बाहेर टाकलेल्या चेंडूवर रोहितने कट शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो झेलबाद होऊन माघारी परतला.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
मुंबई इंडियन्स (Playing XI): रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, कॉर्बिन बॉश, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, कर्ण शर्मा
लखनऊ सुपर जायंट्स (Playing XI): एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), अब्दुल समद, आयुष बडोनी, दिग्वेष सिंह राठोड, रवि बिश्नोई, आवेश खान, प्रिन्स यादव, मयांक यादव