बीसीसीआयने रविवारी इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या १५ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले. वेळापत्रकानुसार, आयपीएल २०२२ चे सर्व लीग सामने मुंबई आणि पुण्यात खेळवले जातील. ६५ दिवसांच्या कालावधीत एकूण ७० लीग सामने आणि ४ प्लेऑफ सामने खेळवले जातील.

वानखेडे स्टेडियमवर २६ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यातील ब्लॉकबस्टर लढतीने IPL च्या १५ व्या हंगामाची सुरुवात होईल.

लीगचा पहिला डबल-हेडर २७ मार्च रोजी होणार आहे. ज्याची सुरुवात ब्रेबॉर्नमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्याशी होईल आणि दिवसाचा दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाईल. पुण्यातील एमसीए स्टेडियमवरील पहिला सामना २९ मार्च सनरायझर्स हैदराबाद राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे.

IPL 2022 : विषय संपला..! मेगा ऑक्शननंतर ‘असे’ आहेत १० संघ आणि त्यांचे खेळाडू; नक्की वाचा!

वानखेडे स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर एकूण २०-२० सामने तर ब्रेबॉर्न, MCA आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे येथे १५-१५ सामने होतील. तर, वानखेडे स्टेडियमवर सनराईजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात २२ मे रोजी लीग टप्प्यातील शेवटचा सामना खेळवला जाईल. प्लेऑफ आणि २९ मे रोजी होणार्‍या अंतिम सामन्यांचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल.