BCCI on IPL 2023: सध्या क्रिकेट विश्वात जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग आयपीएलची धूम सुरू आहे. आयपीएल २०२३ दरम्यान बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे एका ब्रॉडकास्टरचे कोट्यावधी रुपये माफ झाले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कोणत्या कारणासाठी हा निर्णय घेतला आहे, जाणून घ्या.

BCCIने करोडो रुपयांची कर्जमाफी केली

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २०१८ ते २०२३ या कालावधीत स्टार इंडियासोबतच्या मीडिया हक्क करारातून (MRA) एक सामना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे स्टारला ७८.९० कोटी रुपयांची सूट मिळेल. स्टार इंडियासोबत बीसीसीआयचा मीडिया हक्क करार २०१८ ते २०२३ असा होता, जो ३१ मार्च रोजी संपला. यादरम्यान १०२ सामन्यांसाठी ६१३८.१ कोटी रुपयांचा करार करण्यात आला होता, परंतु बीसीसीआयने पाच वर्षांच्या कालावधीत १०३ सामने खेळले.

mumbai High Court encroachment Sanjay Gandhi Udyan
संजय गांधी उद्यान अतिक्रमणमुक्तच हवे, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडेबोल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
sequel of Siddharth Jadhavs film Huppa Huyya
आणि. . . नव्या वर्षाची भेट मिळाली : सिद्धार्थ जाधव, १५ वर्षांनंतर ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
BCCI New Rule Team India Players May Receive Performance based variable pay After Test Defeat
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पराभव पडणार भारी; थेट पगारावर परिणाम होणार? BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Maharera decided to limit self regulatory body representatives tenure
मक्तेदारी मोडीत काढून टाकण्यासाठी महारेराने घेतला मोठा निर्णय
Maharera , Registration , New Housing Project,
स्वयंविनियामक संस्थेतील प्रतिनिधींची आता दोन वर्षांसाठीच नियुक्ती, दोन वर्षांनंतर प्रतिनिधी बदलावे लागणार
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार

हेही वाचा: RCB vs DC: स्निकोमीटर गंडलय! स्टंपिंगचे अपील, थर्ड अंपायरने दिला कॅच आऊट, आयपीएलमधील आणखी एक वादग्रस्त निर्णय

स्वत: जारी केलेली नोट

बीसीसीआयने जारी केलेल्या नोटमध्ये असे म्हटले आहे की ५ एप्रिल २०१८ रोजी बीसीसीआय आणि स्टार मीडिया राइट्स करारानुसार बीसीसीआयच्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सामन्यांसाठी स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला एका सामन्याची सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत एकूण सामन्यांची संख्या १०३ वरून १०२ वर आली आहे.

स्टार इंडियाच्या सूत्रांनी दिले स्पष्टीकरण

तथापि, २०१८ मध्ये मीडिया हक्क करारावर स्वाक्षरी झाल्याचे स्टार इंडियाच्या सूत्रांनी सांगितले. त्यात १०२ सामने आयोजित करण्याची शक्यता होती, त्यामुळे एका सामन्याची फी माफ करण्याचा प्रश्नच उद्भवू नये. सूत्रांनी पीटीआयला सांगितले की मीडिया हक्क करार १०२ सामन्यांसाठी होता आणि स्टार या सामन्यांसाठी पैसे देईल.

हेही वाचा: Delhi Capitals: “मला सॉरी नको म्हणू…”, पाँटिंगने सर्वांसमोर कुलदीपला सांगितली आत्मविश्वास वाढवणारी एक मोठी गोष्ट

मागील तीन वर्षासाठी स्टारसोबतचा करार करण्यात आला

स्टार नेटवर्क आयपीएलच्या आगामी १४व्या आवृत्तीचे प्रसारण सुरू ठेवेल असा करार मागील वर्षा वाढवण्यात आला होता. ९ एप्रिलपासून, स्टारने तीन वर्षांसाठी आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटसाठी प्रसारण कराराचे हक्क सुरक्षित केले होते आणि हा करार गेल्या वर्षी संपला होता. यानंतर अशी अटकळ होती की बीसीसीआय प्रसारण हक्कांसाठी अर्ज मागवू शकते पण हा करार वाढवण्यात आला आहे.

Story img Loader