Rohit Sharma meets fan video viral : आयपीएल २०२४ मधील ६०वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. या सामन्यापूर्वीचा रोहित आणि त्याच्या कोलकातामधील एका चाहत्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रोहित शर्माने त्याची वाट पाहत असलेल्या एका चाहतीचा तिने काढलेल्या पेंटीगवर ऑटोग्राफ देऊन दिवस खास बनवला. रोहितचा कोलकात्याशी विशेष संबंध आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल या दोन्हीमध्ये ईडन गार्डन्स स्टेडियम हे त्याच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे.
टीम बसच्या दिशेने जात असलेल्या भारतीय कर्णधाराची झलक पाहण्यासाठी एक लहान चाहती पेंटीग घेऊन वाट पाहत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पहिल्यादा रोहित शर्माने तिच्याकडे फक्त बघून गेल्याने, तिला वाटले जणू तिने आपल्या हिटमॅनला भेटण्याची संधी गमावली. मात्र, यानंतर मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापन आणि सुरक्षा रक्षकांनी तिची रोहितशी भेट घालून दिली. ज्यानंतर रोहित शर्माने त्या मुलीने काढलेल्या आपल्या पेंटीगवर ऑटोग्राफ देत तिचा दिवस खास बनवला. यानंतर ती मुलगी आनंदाने उड्या मारत जाताना दिसली.
रोहित शर्माच्या भेटीनंतर बोलताना चाहती म्हणाली, “रोहित सरांना भेटण्यासाठी आणि त्यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी मी सकाळी ८ वाजल्यापासून येथे थांबली होती.” हार्दिक पंड्याकडे मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सोपवल्यानंतर रोहित शर्माने आयपीएलच्या या मोसमात बॅटने चांगली कामगिरी केलेली नाही. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सची कामगिरी झाली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा संघ मुंबई इंडियन्स ठरला आहे.
हेही वाचा – VIDEO : गंभीरच्या मार्गदर्शनाखालील केकेआरच्या कामगिरीने भारावला चाहता, गौतमसमोर बोलताना अश्रू अनावर
आजच्या सामन्याबद्दल बोलायचे, तर दोन वेळचा माजी चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, त्यांचा घरच्या मैदानावर या हंगामातील शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सशी होणार आहे. तेव्हा त्यांचे लक्ष्य प्रथमच आयपीएल प्लेऑफचे तिकीट मिळविण्याचे असेल. दोन वेळा विजेतेपद पटकावणारा कर्णधार गौतम गंभीर संघाचा मार्गदर्शक म्हणून परतल्यानंतर केकेआरने या हंगामात चमकदार कामगिरी केली आहे.
हेही वाचा – Italian Open 2024 : डोक्यात स्टीलची बाटली पडल्याने टेनिसपटू नोव्हाक जोकोविचला दुखापत, VIDEO होतोय व्हायरल
आतापर्यंत ११ पैकी आठ सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल असलेल्या केकेआरला प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी आणखी एका विजयाची गरज आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स हा या मोसमातून बाहेर पडणारा पहिला संघ होता. गेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभूत करणारी मुंबई आता प्रतिष्ठेसाठी खेळत आहे.