IPL 2023, CSK vs MI Match Update : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज सायंकाळी महामुकाबला होणार आहे. तत्पूर्वी, सीएसकेला मोठा धक्का बसला आहे. चेन्नईच्या संघाचा सर्वात मोठा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स दुखापतग्रस्त झाल्याने आजचा सामना खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, सराव करताना स्टोक्सच्या पायाला अचानक दुखापत झाली. त्यामुळे स्टोक्सला पूर्ण सराव करता आला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याशिवाय अशीही चर्चा आहे की, स्टोक्स कमीत कमी १० दिवस कोणताही सामना खेळू शकणार नाही. सीएसकेनं आयपीएल ऑक्शनमध्ये बेन स्टोक्सला १६.२५ कोटी रुपयांत खरेदी करून आपल्या टीममध्ये सामील केलं होतं. परंतु, आतापर्यंत स्टोक्सचा जलवा पाहायला मिळाला नाही. त्यानंतर आता स्टोक्स दुखापतग्रस्त झाल्याने सीएसकेला मोठा धक्का बसला आहे.

नक्की वाचा – IPL 2023: विरोधी संघाला धडकी भरणार! ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ वेगवान गोलंदाजाची मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री; Video व्हायरल

द इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, मुंबई इंडियन्सविरोधात होणाऱ्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर वानखेडे स्टेडियममध्ये सीएसकेचा सराव सुरु होता. त्याचदरम्यान स्टोक्सच्या पायाला वेदना झाल्या. त्यानंतर सीएसकेची मेडिकल टीम स्टोक्सच्या दुखापतीवर उपचार करत आहे. स्टोक्स आजचा सामना खेळणार की नाही, याबाबत मेडिकल टीमकडूनच सांगण्यात येणार आहे. स्टोक्स कमीत कमी १० दिवस मैदानापासून दूर राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.