Betting Crime In Cricket : आयपीएल २०२३ च्या १६ व्या हंगामात एकाहून एक रंगतदार सामने होत असतानाच एका दिग्गज क्रिकेटपटूवर सट्टेबाजीचे आरोप लावण्यात आले आहेत. सट्टेबाजीचं प्रकरण समोर आल्यानं क्रीडाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक ब्रॅंडन मॅक्यूलम ऑनलाईन सट्टेबाजीचा व्यापार करण्याचे आरोप लावण्यात आले आहे. इंग्लिंड किंवा वेल्स क्रिकेट बोर्ड याप्रकरणी तपास करत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊन नियमांचं उल्लंघन झालेलं आहे का? याचीही चौकशी सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यूझीलंडचा माजी कर्णधार जानेवारीत सट्टेबाजी संगठन ‘२२ बेट’चा ब्रॅंड एम्बेसेडर झाला होता. त्यानंतर ऑनलाईन व्यवहार सुरु झाल्याची माहिती समोर आली. ब्रॅंडन मॅक्यूलमने २७ मार्चला त्याच्या फेसबुक पेजवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये २२ बेटचा प्रचार करताना दिसतो.

नक्की वाचा – IPL 2023: १३.२५ कोटी दिले पण ‘हा’ खेळाडू चमकलाच नाही, दिग्गज म्हणाला, “याला ‘हॅरी पॉटर’च्या जादूची काठी…”

बीबीसीच्या हवाल्यानुसार ईसीबीने दिलेली माहिती अशी की, आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. ब्रेंडन तसंच २२ बेटसोबत त्यांचे व्यवहार काय आहेत? यावर चर्चा करत आहोत. सट्टेबाजीबाबत आमचे नियम आहेत आणि या नियमांचं काटेकोरपणे पालन होत आहे की नाही, हे तपासलं जातं. ईसीबीने स्पष्ट केलं आहे की, मॅक्यूलम तपासाच्या चौकटीत नाहीय. न्यूझीलंडच्या प्रॉब्लेम गॅबलिंग फाऊंडेशनने मागील आठवड्यात या व्यवहारांबाबत ईसीबीसोबत विचारपूस केली होती.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Betting allegations on brandon mccullum online betting crime in cricket england and wales cricket board ecb 22bet ipl 2023 nss
Show comments