Bhanuka Rajapaksa of Punjab Kings got injured: पंजाब किंग्ज (पीबीकेएस) आणि राजस्थान रॉयल्स (आरआर) संघात गुवाहाटी येथे सामना खेळला गेला. या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी केली. परंतु या डावात शिखर धवनच्या नेतृत्वाखालील संघाला मोठा धक्का बसला. पंजाब किंग्जचा फलंदाज भानुका राजपक्षे जखमी झाला. यानंतर भानुका राजपक्षेला मैदान सोडावे लागले.

जखमी भानुका राजपक्षेला रिटायर हर्ट व्हावे लागले –

आर अश्विनच्या चेंडूवर शिखर धवनने धारदार शॉट खेळला, पण तो चेंडू नॉन स्ट्राइकवर उभ्या असलेल्या भानुका राजपक्षेला लागला. यानंतर पंजाब किंग्ज संघाच्या फिजिओला मैदानात यावे लागले, परंतु दुखापतग्रस्त भानुका राजपक्षेला दुखापत झाल्याने रिटायर हर्ट व्हावे लागले. भानुका राजपक्षे फिजिओसह पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, भानुका राजपक्षे यांची दुखापत किती गंभीर आहे, हे अहवालानंतर स्पष्ट होईल, मात्र भानुका राजपक्षेने ज्या पद्धतीने मैदान सोडले, ती पंजाब किंग्जसाठी चांगली बातमी नाही.

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
Virat Kohli Depicted as Clown in Australian Newspaper After on-field bust up with Sam Konstas in Melbourne IND vs AUS
IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान

सामन्याबद्दल बोलायचे, तर प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने चार गड्यांच्या मोबदल्यात १९७ धावा केल्या. पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने शानदार सुरुवात करत ६० धावा केल्या. त्याच्याशिवाय शिखर धवनने नाबाद ८६ धावा केल्या. जितेश शर्मानेही २७ धावांची खेळी केली. त्यानंतर आलेला सिकंदर रझा मात्र फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. तो फक्त एक धाव काढून बाद झाला. तसेच शाहरुख खान देखील ११ धावांचे योगदान देऊन बाद झाला.राजस्थानकडून जेसन होल्डरने दोन विकेट घेतल्या. चहल आणि अश्विनला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

युजवेंद्र चहल आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणरा दुसरा गोलंदाज –

पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यातील १६व्या षटकातील चौथ्या चेंडूवर जितेश शर्माला बाद करत युजवेंद्र चहलने विक्रम रचला. या विकेटच्या जोरावर त्याने लसिथ मलिंगाचा विक्रम मोडला. लसिथ मलिंगाच्या नावार १७० विकेट्सची नोंद आहे. परंतु आता युजवेंद्र चहलने १७१ विकेट्सची नोंद करत मलिंगाला मागे टाकले आहे. या यादीत ड्वेन ब्राव्हो पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने १६१ सामन्यात १८३ विकेट्स घेतल्या आहेत.

Story img Loader