Bhuvneshwar Kumar Takes 5 Wickets Against Gujrat Titans : आयपीएल २०२३ चा ६२ वा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. एसआरएचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेला गुजरातचा सलामीवर फलंदाज शुबमन गिलने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये धमाका केला. गिलने ५७ चेंडूत १०१ धावांची खेळी करत आयपीएलमधील पहिलं शतक ठोकलं. परंतु, मैदानात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली, ती म्हणजे भुवनेश्वर कुमारची भेदक गोलंदाजी. भुवनेश्वरने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत गुजरात टायटन्सच्या ५ फलंदाजांना बाद केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलामीचा फलंदाज ऋद्धीमान साहाला शून्यावर बाद करून भुवनेश्वरने गुजरातला पहिला धक्का दिला. त्यानंतर शतकी खेळी करणाऱ्या गिलला १०१ धावांवर झेलबाद केलं. कर्णधार हार्दिक पांड्यालाही भुवनेश्वरने ८ धावांवर असताना तंबूत पाठवलं. तसंच कमालीचा फॉर्ममध्ये असलेल्या राशिदलाही त्याने भोपळा फोडू दिला नाही. मोहम्मद शमीलाही शून्यावर बाद केलं आणि भुवनेश्वरने गुजरातविरोधात ५ विकेट्स घेण्याची अप्रतिम कामगिरी केली.

नक्की वाचा – एम एस धोनीच्या IPL निवृत्तीबाबत सीएसकेच्या सीईओंचा मोठा खुलासा, म्हणाले, “धोनी पुढच्या वर्षी…”

गिलने ५७ चेंडूत १०१ धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने गिलला बाद करून गुजरातला मोठा धक्का दिला. या संपूर्ण इनिंगमध्ये भूवनेश्वर कुमारने ५ विकेट्स घेत चमकदार कामगिरी केली. साई सुदर्शनने ३६ चेंडूत ४७ धावांची खेळी साकारली. जेनसेन, फारूकी आणि नटराजनने हैदराबादसाठी प्रत्येकी एक विकेट घेतली. भुवनेश्वरच्या भेदक माऱ्यामुळं गुजरातला दोनशे धावांचा टप्पा पार करता आला नाही.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhuvneshwar kumar takes 5 wickets against gujrat titans in ipl 2023 62 match at narendra modi stadium nss