Virender Sehwag praises Akash Madhwal: आयपीएल २०२२ मधील दुसरा क्वालिफायर सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर २६ मे रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सने लखनऊवर ८१ धावांनी मोठा विजय नोंदवून ही फेरी गाठली आहे. या सामन्यात मुंबईच्या विजयात आकाश मधवालने महत्त्वाची भूमिका बजावली. आता माजी खेळाडू सेहवागने आकाश मधवालने एक मोठं विधान केलं आहे.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा (एमआय) वेगवान गोलंदाज आकाश मधवालच्या गोलंदाजीची पुनरावृत्ती करणे कोणालाही शक्य होणार नाही, असा विश्वास भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने व्यक्त केला आहे. मधवालने आयपीएल २०२३ च्या एलिमिनेटरमध्ये लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध ३.३ षटकात ५ गडी बाद केले होते. त्यामुळे मुंबईने लखनऊचा ८१ धावांनी पराभव केला.
५ धावांत ५ विकेट घेणे कुणालाच शक्य नाही – वीरेंद्र सेहवाग
क्रिकबझशी संवाद साधताना, “सेहवागने मधवालचे कौतुक केले आणि म्हटले की आयपीएलमध्ये मधवालच्या आकडेवारीची पुनरावृत्ती करणे कोणालाही शक्य होणार नाही. सेहवाग म्हणाला, मला देता आले असते, तर मी मधवालला १० पैकी ११ गुण दिले असते. ज्या पद्धतीने त्याने बडोनीला बाद केले, ते अतिशय शानदार होते. मधवालने अवघ्या पाच धावांत पाच बळी घेत अशी आकडेवारी नोंदवली आहे, ज्याची पुनरावृत्ती इतर कोणी करू शकणार नाही, असे मला वाटते.”
हेही वाचा – IPL 2023: “…म्हणून आकाशवर बंदी घालण्यात आली”; मुंबईसाठी खेळणाऱ्या भावाबद्दल आशिष मधवालाचा मोठा खुलासा
माजी स्फोटक खेळाडू पुढे म्हणाला की मधवाल हा विचार करणारा गोलंदाज आहे आणि त्याला आयपीएलमध्ये निश्चितच भविष्य आहे. मधवालने आयपीएल २०२३ मध्ये सात सामन्यांत १३ विकेट घेतल्या आहेत. सेहवाग म्हणाला, “मधवालच्या वेगवान गतीमुळे बडोनीची विकेट मिळाली. कारण बॅकवर्ड लेन्थ बॉल मारण्याचा विचार करत असताना मधवालच्या गतीने मात दिली. मधवाल विचार करणारा गोलंदाज आहे आणि त्याला आयपीएलमध्ये निश्चितच भविष्य आहे.”
मुंबई इंडियन्स आयपीएल २०२३ च्या क्वालिफायर दोनमध्ये हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सशी सामना करेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ २८ मे रोजी याच मैदानावर एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जशी अंतिम फेरीत भिडणार आहे.